पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

33 महिपती: ओव्या. शत्रु भासती मित्रासमान । पराचे नेणे दोषगुण । ब्रह्मरूप भासे जन । हेचि लक्षण संतांचें ॥४७॥ आपली संपदा आणि धन। तस्करी नेले ऐकोन । चित्ती वाटे समाधान । हेचि लक्षण संतांचें ॥ ४८ ॥ आपले आणि पराचे बाळ । रडतां देखूनि तत्काळ । दोहींची सारखी तळमळ । हेचि लक्षण संतांचें ॥४९॥ रायें दिधलें वस्त्रभूषण। की रके आणिलें भाजीपान । दोहींचा संतोष समान। हॉच लक्षण संतांचे ॥ ५० ॥ -भक्तविजय. अपमानीतां न मानी शीण । निखंदितां न क्षोभे मन । धिक्कारितां न रुसणें । भगवज्जन तोचि की ॥ ५१ ॥ उणेपणे लोक लाजविती । तरी खेद न मानी चित्ती । तोंडावरी मारितां नाही खंती । संत त्याप्रति म्हणावें ॥ ५२ ॥ तस्करी हिरोन नेली संपत्ति । प्रयत्न न करी पिशुन हासती । श्रीरामभजनी अधिकोत्तर प्रीती । संत त्याप्रती म्हणावें ॥ ५३ ॥ ज -संतविजय. १९ साधुच्छळाचें फळ. एकनाथ: साकरेचें वृंदावनफळ केलें । कडू म्हणतां ते खयें मुकले । तेवीं साधूचे कर्म निंदोनि बोले । ते ते गेले अधःपाता ॥ १ ॥ -भावार्थरामायण. शुभानंद: ओव्या. संतांसी देतां संतोष । त्यावरी संतोषे जगदीश । संतांते पावलिया क्लेश । नाशी जगदीश त्या समूळी. ॥२॥ घेतां संतांचे प्रसन्नवचन । मनोभीष्ट दे त्या जनार्दन । भक्तद्वेषियाचे हनन । श्रीनारायण मैं करी. ॥ ३ ॥ -उद्योगपर्व. ओवी.