पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-नीतिशतक. श्लोक. R (४०) वामनः-- सवाई. नम्रपणेंचि महोन्नत, जे गुण वर्गुनियां परकीय जनांचे । सांगितल्याविण दाविति कौशल सर्वजनांप्रति जे स्वगुणांचें; ॥ स्वार्थ, परार्थहि, साधिति; जिंकिति शांतिबलें मुखरव खळाचें। - संत महाद्भुत भाजन यापरि सेवन कोण करी न तयांचें ? ॥ ३९ ॥ मोरोपंतः वरि दिसे मृदु मौक्तिक पोवळे, । परि न लेश तदंतर कोंवळे; ॥ न तुळवे विधु, अंकित जो मळे, । सरस साधुमनें शुचि, कोमळें ॥ ४० ॥ मित्राप्तां म्लानि देतो, जरि अमृतरसालागि हा चांद वीतो; । साधू तैसा कसा ? जो सुखवुनि सकळ प्राणियां नांदवीतो; SIR साधूच्या दर्शनाने अशिव तिथि अशी सर्वथा आढळे ना; साधूचे तेज रात्रंदिवस समचि ते सोडुनी त्या ढळेना ; ॥४१॥ ज -भक्तभूषण. गीत.. TEST करुणेचे वतन तुम्ही, शांतीचे भाग्यवंत माहेर,। सुघन ज्ञानरसाचे संत रवे मधुर आंत बाहेर. ॥ ४२ ॥ स्मरभूतभूतवैद्य, स्पर्शमणी सर्व पापिलोहाचे,। ब्रह्मग्रह संत तुम्ही प्रणतजनाच्या अनादिमोहाचे ॥ ४३ ॥ सुरभिस्वर्दुमचिंतामणि शिष्याच दयानिधी पंत; । निजबिंब प्रतिबिंबा अमृतकराचे खरे तुम्ही संत. ॥४४॥ साधुगुणग्राहकता, भूर्ती सर्वत्र सर्वदा समता, । गुरुरीति वसे संतापाशी हे उक्ति सर्व दासमता, ॥ ४५ ॥ विमल सकल गुण तुमचे कां न सुधाधिक म्हणों? निवे दास । ज्यांच्या श्रवणोंच; असे अद्भुत, रुचले म्हणोनि वेदास ॥ ४६ ॥ -दत्तदयोदय.