पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३९) शुभानंद: ओव्या. ब्रह्मसाधनाचा श्रेष्ठोपाय । निगवे धरावे संतपाय। त्याविना करितां बहु उपाय ! एकही नये उपेगा ॥२१॥ शरण अनन्य होतां संतां । संत ते अनन्य शरणागता। कृपा उपजे ज्यांचे चित्ता। उद्धरती पै क्षणैकें ॥२२॥ संत ते साकार अनंतरूप । संत ते पूर्ण परब्रह्मखरूप । संत ते केवळ ज्ञानदीप । दवडिती पापतम प्रकटोनी ॥ २३ ॥ संत तोचि अनंत जाण । संतपूजेनें संतोषे भगवान । फळ बाळका अर्पण । केल्या वडील ज्यापरी ॥ २४ ॥ लालवितां अर्भकातें । स्नेह उपजे पैं जननीतें । भक्त पाववितां सुखातें । ईश्वरातें सुख त्यापरी ॥ २५ ॥ -उद्योगपर्व मोरोपंतः- काजगीर अभग सर्वत्र अद्रोह, अनुग्रह, दान, । हे त्रय, निधान कल्याणाचें ॥ २६ ॥ संतांच्या ठायी हे धर्मत्रय वसे, । इतरत्र नसे क्षणमात्र ॥ २७ ॥ संतांसी जो आला शत्रुही शरण । तयासी मरण न ते देती ॥ २८ ।। फळतो दगड धरितां विश्वास । हे आहे विश्वास अवगत ॥ २९ ॥ मग संती दृढ ठेवूनी विश्वास । सोडिला निश्वास उष्ण कोणीं ॥ ३० ॥ संतांची शाश्वत धर्मी चित्तवृत्ती । अधर्मी प्रवृत्ती स्वप्नी नसे ॥ ३१॥ संतांची संसारनदीनौका कथा । त्या संतांसी व्यथा कासयाची ॥ ३२ ॥ साधुसंत गंगायमुनांचे ओघ । हा संगम मोघ कधी नाहीं ॥ ३३ ॥ संतांपासुनियां संतां भय झालें । असें काना आले नाहीं कधीं ॥ ३४ ॥ संत चालवीती सत्ये तरणीतें । तपें धरणीतें धरिताती ॥ ३५ ॥ किंबहुना संत सर्वांचाही गती । संत मुक्तिपती संत ज्ञान ॥ ३६॥ व्रत चालवी ते एक संतराय । नामें अंतराय जाती दूर ॥ ३७॥ प्रसाद शाश्वत, अर्थ, बहुमान, । यांचे मूलस्थान संत तुम्ही ॥ ३८ ॥ -सावित्रीगीत.