पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३८) डोलती ॥५॥ बकासंगे असतो मराळ । दिसती सारखे शुद्ध धवळ । परी क्षीर आणि जळ । करिती वेगळे हंसचि ॥ ६॥ वायसांत वसे कोकिळ । त्यांचसारिखा दिसे केवळ । परी येतां वसंतकाळ । पंचमवर आळवी ॥ ७ ॥ जंबुकवनांत वाढला केसरी ।परी काय तया जंबुकसरी । क्षणमात्रे गज विदारी। हाकें भरी निराळ ॥ ८॥ स्फटिकांत मुक्ताफळ जाण । दिसे सारिखें समसमान । मुक्त जोहरी काढी निवडून । करिती जतन जीवेंसी ॥ ९॥ पाषाणांत परीस पूर्ण । दिसे तैसाचि जड कठीण । परी तो करी लोहाचे सुवर्ण । कृष्णवर्णातें लपवी ॥ १०॥ कस्तुरी आणि मृत्तिका । दिसे रंग एकसारिखा। परी मृगमदसुवासें सकळिकां । श्रीमंतांसी निववीतसे ॥ ११ ॥ तक दुग्ध एकवर्ण । परी दुग्ध गोड सकळांसी मान्य । तैसें संतांचे रूप जाण । इतरांसमान न गणावें ॥ १२ ॥ --रामविजय. जे चातयाणवींची रत्ने। की शांतिभूमीची निधानें । की भक्तिवनींची सुमनें । विकाशिली साजिरी ॥१३॥ कीं ते वैराग्यअंबरींचे दिनकर। की अक्षय्य विज्ञानानंदचंद्र । की अपरोक्ष ज्ञानसमुद्र । नलगे अंत कोणातें ॥१४॥ की ते प्रेमगंगेचे ओघ । की ते स्वानंदसुखाचे मेघ । अखंड धारा अमोघ । वर्षती मुमुक्षुचातका ॥१५॥ की ते श्रवणामृताचे कुंभ । की ते कीर्तनाचे अचळ स्वयंभ । की ते स्मरणाचे सुप्रभ । ध्वजचि पूर्ण उभारिले ॥ १६ ॥ की ते हरिपद्मींचे भ्रमर । की विवेकमेरूची शृंगें सुंदर । की ते क्षमेचे तरुवर । चिदाकाशी उंचावले ॥ १७॥ की ते मननजळींचे मीन । की ते भवगजारिपंचानन । की परमार्थाची सदनें पूर्ण । निर्मळ शीतळ सर्वदां ॥ १८॥ की ते दयेचे भांडार । की उपरतीचे माहेर । की कीर्तिजहाजें थोर । भक्तिशीड फडके वरी ॥ १९ ॥ की ते परलोकींचे सखे । की ते अंतकाळींचे पाठिराखे । वैकुंठनाथ ज्यांचे भाके । गुंतोनि तिष्ठे त्यांपाशीं ॥२०॥ --हरिविजय,