पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३७ ) जो गर्व स्वयचि दवडी दुरी।शी वाट झाडी पुढारी । तो नारायण नररूपें ॥५॥ हरिहरनामाचे जीवनी । जिव्हा तळपे होवोनि मीनी । कुतर्क शिमग्यासमान मानी । तो नारायण नररूपें ॥ ६ ॥ सत्य आणि सहनशील । तेणें जिंकिलें विश्व सकळ । ऐशिया गुणी सर्वकुशळ । म्हणोनि वंद्य विश्वाते ॥ ७॥ सांभूती समान दया । निर्जर नमस्कारती तया । ऐशिया गुणी भूषित काया । म्हणोनि प्रिय देवातें ॥ ८॥ वनिता मनोरम एकांती । आपण होउनि पुरुषा प्रार्थी । तेथें जो निर्विकल्प चित्ती । तोचि शंकर म्हणों ये ॥ ९ ॥ विजनी भरली कनकें पाहे । देखिल्यावरी लोटी वायें । ऐशी निर्लोभता लाहे । तोचि शंकर म्हणों ये ॥ १०॥ जया अधीन मन इंद्रियें । न मनी सुखदुःखाचे घाये । छळितांही परक्रोधा न ये । तोचि शंकर म्हणों ये ॥११॥ विश्व हे अवयव आपुले । यांही केल्या आपण केलें । ऐसें साचार जया- कळलें । तोचि निश्चयें जगदात्मा ॥ १२॥ - दोषियाचे दोष अनेक । बोलणे तो अविवेकी विशाल HTTERNE न बोले नाठवी तो देख । मूर्तिमंत ईश्वर ॥ १३॥ जाका हि गाना -वनपर्व, TETTIS२८ संतमहिमा. ओव्या. श्रीधरः आतां वंदू संत सज्जन । जे वैराग्यवनींचे पंचानन । की ज्ञानांबरीचे चंडकिरण । उदय अस्त नसे जयां ॥ १॥ जे भक्तसरोवरीचे राजहंस । जे का अविद्यारण्यहुताश । की ते पद्महस्ती विशेष । भवरोगवैद्य होती ॥ २॥ की जीव पावे आपले पदासी । ऐसा मुहूर्त देणार ज्योतिषी । की ते पंचाक्षरी स्वप्रतासी । पंचभूतांसी पळवीत जे ॥ ३ ॥ की दैवी संपत्तीचे भाग्यवंत । मुमुक्षा करिता दरिद्ररहित । की ते दयेची अद्भुत । गोपुरे काय उंचावली ॥ ४ ॥ संत आणि इतर जन । दिसती जैसे समसमान । परी संत सदा आनंदघन । ब्रह्मानंदें