पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३६) मोरोपंतः-नागिन गीति. विदुर म्हणे, जो आस्तिक, गुरुवेदोक्ती जयास विश्वास, । मीपण ज्यास न शिवलें, तो पंडित मान्य होय विश्वास. ॥ ४१ ।। दुर्लभ वस्तु न वांच्छी, न करी जो नष्ट वस्तुचा शोक, ।। आपत्तींत न मोहे, त्या पंडित म्हणति जाणते लोक ॥ ४२ ॥ वहु कर्म करी पंडित, कथनावसरीहि थोडकेंच वदे । । शाकांत प्रवर जसे, पथ्यहि तैसेंच, दोडकें चव दे. ॥ ४३ ॥ चुकवी कुगति, यशें उत्सुकवी सन्मन, असन्मने सुकवी, । सुखवी मातेला निजमुखवीक्षामृतरसेंचि तो सुकवी. ॥ ४४ ॥ देहादि द्वैत मृषा जाणोनि परस्वभावकर्माते । जो न स्तवी, न निंदी पावतसे तोचि सुज्ञ शर्मातें. ॥ ४५ ॥ -स्कुट वामनः श्लोक. जे का ज्ञाने लाधले सद्विचारा, । संपत्तीचा त्यांपुढे काय तोरा? ॥ पद्माचा जो तंतु तो वारणाला। वारायाला 4 म्हणे सिद्ध झाला. ॥४६॥ -नीतिशतक... Ghanta १७ देवतुल्य सत्पुरुष. मक्तेश्वरः-- ओव्याः जो ऐश्वर्ये न चढे मदा। दरिद्रत्वें दीनत्व न शिवे कदा । निंदी त्याची न करी निंदा । तो नारायण नररूपें ॥१॥ कामक्रोधभूतसंचारी । न चळे सुविचारपंचाक्षरी । परधनपरस्त्रीपासोनि दुरी । तो नारायण' नररूपें ॥ २॥ परोत्कर्षे निर्वैर मनीं । समानबुद्धि मानापमानीं । दंभाचार सांडिला मनीं। तो नारायण नररूपें ॥३॥ स्वधर्मकर्पूरगृहाआतौती । जिव्हालिंगप्रदीपत्ववाती । रानी रहाटे सावधमति । तो नारायण नररूपें ॥ ४ ॥ सज्जनश्रोत्रियां देखोनि नेत्री ।