पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३५) तो उचित करी समर्पण । तो पद पावे ब्रह्मनिर्वाण । तोचि पंडित जाणिजे ॥ २४ ॥ कमें सुखदुःख या जगती । योनी चौयायशी भोगिजती । निष्कर्म पावे सायुज्यमुक्ति । तोचि पंडित जाणिजे ॥ २५ ॥ ब्रह्म जाणोनि अंतरीं । पाहुणेयापरी संसारीं । परद्रव्य परस्त्रीपासूनि दुरी । तोचि पंडित म्हणावा ॥ २६ ॥ पक्षी आला आंगणा । पथिक आला पट्टणा । कमळपत्रींच्या जळकणा । संसारी शहाणा त्यापरी ॥ २७ ॥ मनी जाणोनि आपले हित । सदा संसारी अलिप्त । कल्पना मारिली समस्त । तोचि पंडित म्हणावा ॥२८॥ गेलेयाचे दुःख न करी । केलें न बोले बाहेरी । परनिंदा जिन्हा स्पर्श न करी । तोचि पंडित जाणावा ॥ २९ ॥ सर्वांभूती दयापर । बोलणें तें मधुरोत्तर । शब्दें न फोडी परजिव्हार । तोचि पंडित जाणिजे ॥ ३० ॥ जैसें तोय मधुर शीतळ । परी पाषाण भेदुनि निघे झुळझुळ । आर्जवें साधी कार्य सकळ । तोचि पंडित म्हणावा ॥ ३१ ॥ भावें करी हरिहरभक्ति । श्रवण कीर्तन सत्संगती । नुलंघी धर्मशास्त्रवित्पत्ती । तोचि पंडित जाणिजे ॥ ३२ ॥ चंदन अगर धूप कर्पूर । हे श्रमविती स्वकीय शरीर । स्वयें जोडोनि परोपकार । वंद्य झाले हरिहरां ॥ ३३ ॥ तैसा पुण्यात्मा पावन । सत्य न सोडी गेलेया प्राण । अनुद्वेगें भूतकृपाळ पूर्ण । तोचि ज्ञानी पंडित ॥ ३४ ॥ सुखदुःखी नव्हे निमग्न । पराचे दुःखें दुखवे मन । आत्मवत्सर्वभूतीं मानी जन । तोचि पंडित म्हणावा ॥ ३५ ॥ जैसी गंगा का धरणी । परी अनुपकार नाणी मनीं । त्यापरी क्षमाशीळ जनीं । तोचि पंडित म्हणावा ॥ ३६ ॥ नाठवी आपण उचित केलें । न स्मरे दुजयाने दुःख दिधलें । ईश्वरसूत्राते ओळखिलें । तोचि पंडित म्हणावा ॥ ३७ ॥ शास्त्रमर्यादा सदा पाळी । पुराणश्रवणीं प्रीति आगळी । परातें तोषवी सर्वकाळी । तोचि पंडित जाणिजे ॥ ३८ ॥ सन्मानिलेया हर्ष नोहे । अपमान केलेया क्रोध नोहे । गंगान्हदसम स्वस्थ आहे । तोचि पंडित जाणिजे ॥ ३९ ॥ सर्वांतरी वासुदेवो । उद्भवस्थितिनाश न भावो। जाणे ज्ञानियांचा रावो। तोचि पंडित जाणिजे ॥ ४० ॥ -उद्योगपर्व,