पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३४) काळी न फुगे मनीं । दुःख आलेया नाफळी मूर्ती । शीत उष्ण मानापमानी । तोचि पंडित जाणिजे ॥६॥ वर्णाश्रमकर्मआचरण । धर्मार्थ अर्थपरिग्रहण । कामना सांडोनि करी दान । तोचि पंडित जाणिजे ॥ ७॥ स्वशक्ति ऐशी अद्वैतभक्ति । आगळा सोस न मनी चित्तीं । परानुदु:ख न मानिती । तोचि पंडित जाणिजे ॥८॥ परपैशुन्य नायके कानी । परिसुनी न बोले वदनीं । स्नेह वाढवी सज्जनीं । तोचि पंडित जाणिजे ॥९॥ अप्राप्य त्याची इच्छा न करी । गेलेयाचा शोक मनी न धरी । आपत्काळी धैर्य धरी । तोचि पंडित जाणिजे ॥१०॥ विभागासी आली पाळी । वर्ते संतसजनमेळीं । ज्ञानदृष्टी आत्मा निहाळी । तोचि पंडित जाणिजे ॥ ११॥ अनायासी हो सायासी । अर्थ आलेया हातासी । द्वैतभक्ती तोषवी जनासी । तोचि पंडित जाणिजे ॥ १२ ॥ नित्यानित्यविवेक । मनी सांडिला संकल्प । सर्वदा आत्मा उपासक । तोचि पंडित जाणिजे ॥ १३ ॥ अंतरी बोधिला ब्रह्मबोधे । बाहेरी चाले जनाचे छंदें । मुख न विटाळे नीच शब्दें । तोचि पंडित जाणिजे ॥ १४ ॥ ऐश्वर्य आलेया संपूर्ण । नाभिमाने आत्मा सज्जन । भजोनि पावे समाधान । तोचि पंडित जाणावा ॥ १५ ॥ आश्रय झालेया समर्थाचा । परोपकारी वर्ते वाचा । चाळा लावी हरिअजनाचा । तोचि पंडित जाणावा ॥ १६ ॥ आपणासमान सर्वांतरीं । सुख मानी संसारीं । भूतकृपाळ सदाचारी । तोचि पंडित म्हणावा ॥१७॥ सर्वदा हरिहरनामजप । निववी दुर्जयाचा संताप । परातें नेदी पश्चात्ताप । तोचि पंडित जाणिजे ॥ १८॥ या नश्वर संसारी । न तोडी धर्मगळसरी । कल्या कमा कामना न धरा । ताचि पंडित जाणिजे कर्मादिक । यथाशक्ति करी साधक । तें ब्रह्मार्पण करी सकळिक । तोचि पंडित २० ॥ जो कां कल्पी फळकामना । ते व्यभिचारभक्ति माना । जैशी जारकुळांगना । धर्ममार्गी अपवित्र ॥ २१ ॥ ते भ्रतारसेवा बरवी की। परी भ्रतार दुखवे अंतरीं । तैशी भक्ति व्यभिचारी । भोक्ता श्रीहरी तिचा नोहे ॥ २२ ॥ काया वाचा मनेंकरून । भावें करितां समर्पण । दंभफळाशा त्यजून । श्रीनारायण तिचा भोक्ता ॥ २३ ॥ तेव्हां भोक्ता जनार्दन ।