पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

E ॥ १७ ॥ देह परमार्थी लाविलें । तरीच याचें सार्थक झालें । नाहीं तरी व्यर्थचि गेलें । नाना आघातें मृत्युपंथे. ॥ १८ ॥ -दासबोध. ११ दारिद्य व याचना. मुक्तेश्वरः ओव्या. मग म्हणे ऐक नागनाथा । गृहस्थां आम्हां कुटुंबवंतां । दारिद्यतुल्य दुसरी व्यथा । ये संसारी असेना ॥१॥ दारिये जीतचि प्रेत जाण । दारिद्र्य योग्यता तृणासमान । दारिद्र्ये विद्यासमुद्र द्रोण । द्रुपदें छळूनि दवडिला ॥ २ ॥ दारिद्र्यो उदास पुत्रदारा । दारिद्र्ये-सुहृद पाठिमोरा । दारिद्ये नैषधयुधिष्ठिरां । रानोमाळ भवंडिलें ॥३॥ दारिड्ये श्रेष्ठ कर्मठवेषी । दारिद्ये परमार्थ जनाची दासी । दारिये गांजिल वनतापसी । धनिकांद्वारी धांवती ॥ ४ ॥ STEP-आदिपर्व. दारिद्यकाळामाजी देख । नीच श्रेष्ठातें म्हणती मूर्ख । । उपहासिती सकळ लोक । आप्तवर्ग विशेषे ॥ ५॥ TEE -वनपर्व. मापक शभानंदः-शाना ओव्या. HTRIANE दोषी दरिद्री अधम । दरिद्री तो प्रेतासमान । दरिद्रदोषीं पातक परम । अधर्म असत्य आढळे ॥ ६॥ दरिद्रास्तव वनिता कटी। आचरती त्या अधम रहाटी । हिंसा तस्कर नरहिंपुटी । नरक कोटी भोगावा ॥ ७ ॥ दरिद्रियासि नाही हर्ष । सुहृद असल्या ठेविती दोष । जैसा अपुष्प फळवृक्ष । त्यागी पक्षी सर्वदा ॥८॥ जैसे शुष्क तडाग थोर । उपेक्षोनि जाति समग्र । तैसा तो मैं दरिद्री नर । परम अपवित्र तिहीं लोकीं ॥ ९॥ वर्तत असतां तो शरीरी। परी प्रेताऐसा तो लोकाचारी । समयीं भोजना निराहारी। कां परद्वारी याचक ॥१०॥ जीवंत म्हणावा धनाढ्य नर । उभय लोकी तो पवित्र । तिहीं लोकी अपवित्र । विज्ञानहीन निर्धन ॥ ११॥ जो कां सभाग्य धनाढ्य नर । तोचि सबळ बलाढ्य