पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

थोर । धर्म अर्थ काम स्वर्गपर । धनाच्य नर भौगिती ॥ १२ ॥ दरिद्रदोषे पातक घडे । वर्णसंकर दोष जोडे । पितरांसहित नरकी बुडे । तेणें दोषकरोनि ॥ १३ ॥ ISE -उद्योगपर्व. महीपतिः-- द्रव्य नसतां आपुले पदरी । बंधु म्हणती आमुचा वैरी । पिशुन हांसती दुराचारी । ऐसी परी मायेची ॥ १४ ॥ देखोनि निजपुत्र नयनीं । पिता कंटाळे तये क्षणीं । म्हणे आमुचे पोटीं येऊनी । अपकीर्ति तुवां केली ॥ १५ ॥ शेजारी लोक होती कटी । म्हणता उगाच पडतो आमचे दृष्टी । कन्या भगिनीच्या जातां भेटी । लज्जित पोटी त्या होती ॥ १६ ॥ दुर्बळ भ्रतार असतां जाण । कांता नेदीच आलिंगन । पुत्र म्हणती आम्हांसि ऋण । करूनियां ठेविलें ॥१७॥ पुरुष झालिया द्रव्यहीन । त्यासी न पुसती सोयरे पिशुन । जेवीं वृक्षाची पत्रे गेलिया झडोन । तेथें विलासीजन न रमती ॥१८॥ की रणी पडतांचि नृपती । देहलोभी रण टाकूनि पळती । तेवीं दरिद्र येतां पुरुषाप्रती । पिशुन करिती अपमान ॥ १९॥ 5 55 मा मा भक्तविजय. मोरोपंतः-माना गीति. शार कर्मरहित मुख तैसें लोकी श्रीहीन जीवन स्पष्ट, । नष्ट खकीर्ति सत्कृति, जन पावे ते न नारकी कष्ट. ॥ २० ॥ HERE हारलानस्फुट. वामन: लोक. असे जयाला धन तोचि पंडित । कुलीन तो, तोचि गुणी बहुश्रुत, ॥ तो मान्य, तो सुंदर, तो विचक्षण, । धनाश्रये राहति सर्वही गुण. ॥२१॥ गाइ समालो --नीतिशतक. मक्तेश्वर- ओव्या. त र अयोग्य वित्पन्नासी तंडे । निशस्त्री शस्त्रधरासी भिडे । दातयासी मागते तोंडें । थोरीव बोले आपुली ॥२२॥ अवलोकिता लोकी तिहीं। मागण्यापरतें हीनल नाहीं। 103518