पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१) - स्वर्गभोग । नव्हे सांग निजप्राप्ति ॥ ५॥ देहभयें सकळ दुःख । अणुमात्र नव्हे सुख । आकल्प भोगावे नरक । दुःख अलोलिक देहसंगें ॥ ६ ॥नामा -भावार्थरामायण. महीपतिः देह सकळ रोगांचे घर । देह कामक्रोधांचे मूळ साचार । त्रिगुणांचे विकार । देहापासूनि उठती पैं ॥ ७ ॥ औवी. भक्तविजय. Tp यो si EER देह-गुण लगाने मोडो नाममा भार आव्या . या नरदेहाची वसती । लक्ष चौऱ्यायशी जीव कल्पिती । ह्यांतचि साधिजे सत्कीर्ति। साधिजे जीवन्मुक्ति या देहीं ॥ ८ ॥ वित्त गेलेया मिळेल पुढती । राज्य गेलेया मिळेल भूपति । विद्या पुत्र मिळेल युवती । देह पुढती मिळेवा ॥ ९॥ रणी वेचिल्या शरीर । सग कोणाचा संसार । काय कीजे स्त्री सुंदर । नगर घर कोणाचें ॥ १० ॥ कोणाचे द्रव्य कोण माता । कैंचा पुत्र कैंचा पिता । यालागी यत्न आपुल्या जीविता । नानापरी रक्षिजे ॥ ११ ॥ आत्मनाशे सर्व शून्य । आत्म्यालागीं त्यागिजे भुवन । करावया प्राणाचे रक्षण । पृथ्वीतल त्यजावें ॥१२॥ काऊ उद्योगपर्व. रामदास: ओव्या. काही ॥ धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पहा हो । जो जो कीजे परमार्थलाहो । तो तो पावे सिद्धीतें ॥१३॥ या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनांचेनि द्वारें। मुख्य सारासारविचारें । बहुत सुटले ॥१४॥ या नरदेहाचेचि संबंधे। बहुत पावले उत्तम पदें । अहंता सोडोनि स्वानंदें । सुखी झाले ॥१५॥ पशुदेहीं नाहीं गती। ऐसें सर्वत्र बोलती । म्हणोनि नरदेहींच प्राप्ति । परलोकाची ॥१६॥ नरदेह हा स्वाधीन । सहसा नव्हे पराधीन । परंतु परोपकारी झिजवून । कीर्तिरूपे उरवावा