पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भ्रमवी वन । नेदी विश्रांति ॥ १२ ॥ चिंता हृदयींचा अंधकारु । चिंता हा कृष्णु विखारु । चिंता नाशी तोची गुरु । संसारत्राता ॥ १३ ॥ बाह्यांतरी व्याकुळता । पुरुषा आणी चिंता । चिंतासागरी बुडतां । दुजें न पवे ॥ १४ ॥ दैन्य घडवी वदन । तटस्थ राहती करचरण । निभिषोन्मेषही नयन । विसरोनी जाती ॥ १५ ॥ कार्यातें सांडूनि करणें । उगीचि राहती जडपणे । न स्फुरती विषयज्ञाने । चिंतेकरितां ॥ १६ ॥ भक्षितां न कळे अन्न । न कळे बोलतां वचन । आइकतचि दोन्ही श्रवण । बधिर होती ॥ १७ ॥ आंगी आदळलेही न कळे । सुखदुःख चिंताकाळे । मन इंद्रियां न मिळे । इंद्रिये अर्था ॥ १८ ॥ अंगा खुपे शेज । गंधु न कळे जाणिज । डोळां देखिलें मनुज । वोळखेना ॥ १९ ॥ आगी. वीण चिंता जाळी । सुखांशु अवघा गिळी । चिंतेऐसें भूमंडळीं । दुष्ट नाहीं ॥२०॥ नगीतार्णव, स ...--.EERESTEG ९ माता. श्रीधर: ओव्या. मातेची आज्ञा सर्वथा । न मोडावी प्रमाण शास्त्रार्था । REL संन्यास जरी घेतला तरी माता । वंदावी है साचार ॥१॥ -रामविजय. कुरूप बाळ देखोनि । प्रीती न पाविजे जननी। जरी माता त्याचे अवगुण आठवील मनीं । तरी तें कैसें वांचेल ॥ २ ॥ अति उदार असे बलाहक । ज्यातें इच्छिती सकळ लोक । तो तुच्छ मानील जरी चातक । वांचणे केवीं घडे ॥३॥ पाहतां तो अमृतकर । जो क्षीराब्धीचा पुत्र । तो जरी तृप्त न करी चकोर । तरी तेणें कैसें वांचावें ॥४॥ -जैमिनिअश्वमेध, एकनाथ:-- माओव्या. स्वधर्मकर्मी निपुण । दहा ब्राह्मण अति सज्ञान । एक आचार्य त्यांसमान । ऐसें महिमान आचार्याचें ॥५॥ दशआचार्यश्रेष्ठ कर्मप्रकृति । त्याहूनि पि.