पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Filimचिंता. जेवीं कांजी पडता बिंदुमात्र । घट भरोनि नासे क्षीर । तेवीं सर्व सुखांचा संहार । चिंता करीत क्षणमात्रे ॥ १ ॥ जो चिंतार्णवामाजी पडला । तो परपारासी नसेचि गेला । माजी विश्रांति घ्यावया तयाला । मध्य वेट ते असेना ॥२॥ जो चितावनामाजी भरला । तो भ्रांतीलासीने ग्रासिला । तो दुर्गतीते सहज पावला । नाहीं आला निजधामा ॥ ३ ॥THERS -जैमिनिमश्चमेव. महीपतिः- EPऔवी. Timmy की चिंता उद्भवली मानसीं । तें उपचार न सुचे मानवासी। सन्निध देखता अगस्तीसी । भरतें सागरासी नये की ॥ ४ ॥ -भक्तविजय. एकनाथ: ओव्या चिंता संचरल्या शरीरी । सुख नेदी तिळभरी । लागतां चिंतेची लहरी । सुरासुरी कापिजे ॥ ५ ॥ सुख नेदी राजभवन । सुख नेदी भोगायतन । दारापुत्रादि जन । सुख जाणं न देती ।। ६ ॥ सुख नेदी धनसंपत्ति । सुख नेदी सकळ संतती । सुख नेदी यशकीर्ति । चिंता चित्ती प्रवेशतां ॥ ७ ॥ चिंतेने नव्हे इहलोक । चिंतेने प्राप्त नव्हे स्वर्गिक । चिंतेने न साधे योगसुख । चिंतादाह देख भला नव्हे ॥ ८॥ परमानंदाचे वन समग्र । चिंतेने जाळिले चौफेर । चिंतेने परमार्थाचें घर । निरंतर उद्वसे ॥ ९ ॥हिला त कि -भावार्थरामायण. दासोपंत:--- ओव्या . चिंता पुरुषार्ते बंधन । चिंता जातीचे मरण । चिंता सुखाचें छेदन । दुःखदाती १०॥ चिंता हृदयींचा रोगु । चिंता नाशी परम योगु । आंगीं लागला सुखभोगु । भोगू नेदी ॥ ११ ॥ इंद्रियांने करी शोषण । देहावरी नये मन । चिंता