पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याची अधिक शक्ति । पुत्रविक्रयों का दूरी कायार्थी । नेमकत्वें निश्चिती पिता अधिक ॥६॥ दशआचार्यविशेषीं । गुरुत्वें गौरव पित्यासी । पित्याहूनि दशगुणेसीं । गुरुत्वें मातेसी पूज्यत्व ॥ ७ ॥ गर्भधारणा पोषणेसीं । मातेसी गुरुत्व विशेषीं । पृथ्वीपरीस मातेसी । पूज्यत्वासी गौरव ॥ ८ ॥ पिता जालिया पतित । पुत्र त्यागावा निश्चित । माता झालिया पतित । पूज्य शास्त्रार्थ प्रतिपादी ॥ ९ ॥ पुत्र झालिया संन्यासी । अवश्य त्यागावें पितयासी । भिक्षा मागोनी मातेसी । पोसावें संन्यासी, विधिशास्त्रार्थे ॥१०॥ जे गोड लागे माउलिसी । तोंडींचे काढी ते वेगेंसीं । वोपी बाळकाच्या मुखासी । निजमानसीं स्नेहाळू ॥ ११ ॥ बाळातें बोलों शिकवी माता । तीपुढे ते वाचाळता। करिता सुखावे माता । परी सर्वथा क्षोभेना ॥ १२॥ TEFEलामा-भावार्थरामायण. महीपतिः- ओव्या. धरणी उबगली वृक्षासी । तरी ठाव नाहीं जावयासी । की मायेनं टाकितां गिबाळकासी । तरी कोण तयासी सांभाळी ॥ १३ ॥ कासवी न पाहे कृपादृष्टी । तरी पिली कैसेनि वांचती । राजा न करी न्यायनीती । तरी पावती प्रजा केवि सुख ॥ १४॥ -भक्तविजय. मातेपुढे नेणते बाळ । अवाच्य वाणी भलतेंचि वरळे । परी जननी कौतुका मानुनी केवळ । पुरवी लळे तयाचे ॥ १५ ॥ आपली माय दुर्बळ आहे । तरी ते बाळके त्यागू नये । दुसरी सुंदर वनिता पाहे । परी पान्हा न ये तिजलागीं ॥१६॥ साhिiriमोड -संतविजय. मोरोपंत:--- गीति.REET HERE मातृस्तन्यावांचुनि शिशुचा कृश होय वरदुधे काय; बालकपालक जननीस्नेहचि, बोलोनि बहु बुधे काय ? ॥ १७ ॥ Jaman स्नेहें शिशुला देइल मातेहुनि अधिक काय सुख दाई ? । चंद्रापुढे चकोरा ग्रह होइल कोण अन्य सुखदाई ? ॥ १८ ॥