पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीधर:- ओंव्या. कोक Est भवाब्धि भरला परम तुंबळ । द्वैतभावाचा तटाक सबळ । माजी कुबुद्धीचे कल्लोळ । मोहजाळ असंभाव्य ॥ २६ ॥ मदमत्सर थोर आवर्त । कामक्रोधादि समस्त । आशा तृष्णा भ्रांती तेथ । मगरी थोर तळपती ॥ २७ ॥ लोभ मोह नक थोर । ममतेच्या लाटा अति दुर्धर । दंभ आणि अहंकार । विरोळे हे तळपती ॥२८॥ अविवेक ही डांकिणी तत्वतां । अविद्या भ्रांति F जळदेवता । पीडिती जीवां समस्तां । आशा तृष्णा कल्पना ॥ २९ ॥ ऐसा 1 अगाध भवनिधि थोर । तेथें रामकथा जहाज सुंदर । शिल्पकार वाल्मीक ऋषीश्वर । तारूं तेणें निर्मिलें ॥ ३० ॥ नाना चरित्रं सुंदर । याचि कळा दृढ थोर । विवेक जोडून समग्र । अभेदत्व साधिलें ॥ ३१ ॥ साहित्य गर्ने लोहबंद । आनंदपद खिळे विविध । दृष्टांतदोर प्रसिद्ध ॥ ठायी ठायीं आवळिले ॥ ३२ ॥ अर्थरस तेल निखिल । तेणें सांधे बुझिले सकळ । रसप्रसादस्तंभ विशाल । कीतीसी फडकतसे ॥ ३३ ॥ सप्तकांड सप्तखण । लोटीत भवप्रभंजन । निजबोध कर्णधार पूर्ण । सकळ सुजाण देखणा ॥ ३४ ॥ ज्ञान आणि वैराग्य भक्ति । हीच आवली आवलिती । या जहाजावरी तेच वैसती । अद्भत ग्रंथीं पुण्य ज्यांचें ॥ ३५ ॥ राम नाम घोष थोर । हेचि यंत्राचे भिडिमार । नादें जळचर समग्र । भयभीत पळताती ॥ ३६ ॥ ऐसें भवसागरी तार थोर । गुरुकृपेचें केणे अपार । भरूनि मोक्ष द्वीपांतर । लागवेगें पाविजे ॥ ३७ ॥ E S ISiपिक रामविजय. संसाराहूनि अन्य सुख । कांहीं पुत्रा नाहीं देख । आहे म्हणती ते परम मूर्ख । पर्ण अभागी ते जाण ॥ ३८॥ परमार्थ तो केवळ शूळ । त्यावरी पडावया को उतावेळ । संसार मिष्टान्नाचा कवळ । कारे मुखांतूनि काढिसी ॥ ३९ ॥ वर्ग तो गगनकल्हार । परमार्थ तो गंधर्वनगर । हरिभक्ति जाण तें मृगनीर । एक संसार खरा असे ॥ ४०॥ -जैमिनिअश्वमेध.