पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तिसी वस्त्रेभूषणे करितां गोड । आपल्यासी मरण येतां रोकडें । मग ते रडे केश देतां ॥ ११ ॥ कन्या भगिनीचें पडप । बोळवण न करितां साक्षेप । - म्हणती मेला आमुचा बाप । चित्ती कोप धरोनी ॥ १२ ॥ संसारओझें न घेतां ॥ शिरीं । बंधु म्हणती आमुचा वैरी । जोडा पोसावा कोठवरी । यास्तव बाहेरी । घालिती ॥ १३ ॥ दरिद्र येतां आपणाकारणें । तरी उपहास करूनियां हांसती पिशुन । पुत्र म्हणती आम्हांकारणे । करोनि ऋण ठेविलें ॥ १४॥ ऋण द्यावया 1 घ्यावयास तरी । पाठी पोटी येतात वैरी । हे तुझिया दुःखाचे वांटेकरी । कोणीच निर्धारी असेना ॥१५॥ पोटीं संतान जरी नसे । तरी नवस पुरवितां होती क्लेश । होउनी मरतां संतानास । तरी दुःखशोकास कारण ॥ १६ ॥ वांचतां निघाला अवगुणी । वडिलांसी भांडे वृद्धपणीं । तेव्हां दुःख वाटतें मनीं । म्हणती निःसंतानी तो बरा ॥ १७ ॥ एवं संसार दुःख मूळ जाण । केवळ इंगळाचे अंथरुण । येथे सुख मानूनि घेणें । तरी शतमूर्खपणे तो नर ॥ १८॥ ढेकणाचे बाजेवरी । चईन न पडे निमिषभरी । मुर्कुडी मारूनि निजला तरी । कुसमुस अंतरी सर्वदा ॥ १९ ॥ संसारी असतां देव जोडे । ऐसें निश्चित जरी घडे । तरी शुकादिक कां होउनी वेडे । बैसती कडेकपार्टी ॥ २० ॥ मागुती सद्गुरु बोलती काय । शुक नळिकेवरी बैसला पाहे । त्यासी पडावयाचे वाटे भय । अधिकचि पाय गोंवीतसे ॥ २१ ॥ पंख असोनि आपणास । उडोनि जावें न सुचे त्यास। मग धरोनि नेतां हिंसकास । पिंजऱ्यांत असे जन्मवरी ॥२२॥ नातरी पाषाणासी छिद्र पाडोनी लहान । तयामाजी घालितांचि चणे । माकड मूठ भरीतसे जाण । न निघे म्हणोनि चडफडी ॥ २३ ॥ तेव्हां दर्वेसी येउनी जवळा । साकळदंड घालिताति गळां । घरोघरी हिंडविती त्यांजला । सलाम लोकांना करविती ॥ २४ ॥ शकवानरांऐसे भले । प्राणी संसारी गुंतले । आपआपणासी बंधन केलें । जैसे वा धारल फांदसी ॥ २५॥ माता -भक्तविजय,