पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११) ४. प्रेम. श्रीधर : ओव्या. प्रेमावीण कायसें ज्ञान । प्रेमावीण व्यर्थ ध्यान । प्रेमावीण जें गायन । व्यर्थ जैसे गौरियांचे ॥ १ ॥ प्रेमावीण व्यर्थ पूजा । कदा नावडे अधोक्षजा । प्रेमावीण अभ्यास सहजा । व्यर्थ सर्व विद्येचा ॥२॥ एक नसतां प्रेमकळा । अवघ्या त्या विकळा । शरण न रिघतां तमाळनीळा । सकळ साधनें व्यर्थचि ॥३॥ स्त्री सर्व लक्षणी सुंदर पूर्ण । परी पतिसेवेसी नाहीं मन । तिचें चातुर्य शहाणपण । व्यर्थ काय जाळावें ॥ ४ ॥ गळसरीवीण अळंकार । भूतदयेवीण आचार । की रविशशीवीण अंबर । तमें जैसें व्यापिलें ॥ ५ ॥ की गुरुकृपेवीण ज्ञान । की आवडीवीण भजन । की गृहस्वामिणीवीण सदन । व्यर्थ जैसें भणभणीत ॥६॥ की रायावीण परिवार । की नासिकेवीण कैसे वक्र । तैसें प्रेमावीण स्मरारिमित्र । कदाकाळी न सांपड़े.॥ ७ VER मागी निजामहारावजय. महिपति ने राजा ओवी. कोणी TES परी आवडीची ऐसी जाती । बाळकें मातेसी भलतेंच बोलती । नाक परी जननीस त्याची न वाटे खंती । ऐकूनि तुष्टे ती निजलोभे ॥ ८ ॥ ने मत विजय. -SSnippin एकनाथ: प्रेम तेथे भाव पूर्ण । प्रेम तेथें वैराग्य गहन । प्रेमें निरसे जन्ममरण । प्रेमेंविण ज्ञान वांझोटें ॥ ९ ॥ प्रेम तेथे उपजे भक्ति । प्रेम तेथे नित्य विरक्ति । प्रेम तेथे अढळ शांति । प्रेमळां मुक्ति वोळंगल्या ॥१०॥नमा कि भावार्थरामायण.