पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२) ५. ईश्वरी क्षोभ. मुक्तेश्वर: ओव्या. आपल्या अपकाराच्या घायीं । शल्य वाढले ज्याचे हृदयीं । अडल्या लोटांगण त्याचे पायीं। ईश्वरक्षोभ या नांव ॥१॥ आपुला अर्थ लोकांवरी बुडे । लोकांचे देणे अचूक घडे । वैरियासी वर्म सांपडे । ईश्वरक्षोभ या नांव ॥ २॥ लाभार्थ कष्टतां होय हानी । अवमान पाविजे पूजास्थानी । सुहृत् प्रवर्ते शत्रूच्या गुणी । ईश्वरक्षोभ या नांव ॥ ३ ॥ES S कमला डाग आदिपर्व, श्रीधर:- ! ओव्या गाडीको आमाणातक VIB TUESS to 1.FFE. THISTE17C 155 1 ईश्वर झालिया पाठमोरा । नसंती विघ्नं येती घरा । महारत्ने होती गारा । न पुसे कोणी तयातें ॥ ४ ॥ आपुलें द्रव्य लोकांवरी । बुडुनि जाय न लाभे करीं । ज्यांचे देणे ते द्वारी । बैसती आण घालूनी ॥५॥ वैरियांकरी सांपडे वर्म । आळस बहुत येउनी बुडे धर्म । विशेष वाढती क्रोधकाम । तरी देव क्षोभला जाणिजे ॥ ६॥ लाभाकारणे निघे उदिमासातों हानीच होय दिवसें दिवस । पूज्यस्थानी अपमान विशेष । तरी देवक्षोभ जाणिजे ॥ ॥ सुहृद अत्यंत द्वेष करिती । नसतेचि व्यवहार गळां पडती । सदा तळमळ वाटे चित्तीं । तरी देवक्षोभ जाणिजे ॥ ८॥ आपली स्त्री राज्य धन । शत्रू भोगूं पाहे आपण । देह व्याधिपीडित पूर्ण । तरी देवक्षोभ जाणिजे ॥ ९॥ विद्या बहुत जवळी असे । बोलूं जातां मति भ्रंशे । कोणी तयासी न पुसे । तरी देवक्षोभ जाणिजे ॥१०॥ठेविली ठेव तन सांपडे । नसतीच व्याधि अंगीं जडे । सदा भय वाटे चहूंकडे । तरी देव क्षोभ जाणिजे ॥ ११ ॥ वृद्धपणीं ये दरिद्र । स्त्री मृत्यु पावे गेले नेत्र । महेळसूनि उपेक्षिती पुत्र । तरी देवक्षोभ जाणिजे ॥१२॥ -रामविजय.