पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाचून कळेना ॥ ४० ॥ जे कूपामध्ये बेडूक रहात । ते काय जाणती पयोब्धीची मात । तेवी गुरुभक्तांची खूण निश्चित । माया लोभियांस कळेना' ॥ ४१ ॥ I S भक्तविजय. जैसा भाव आणि भक्ति सप्रेम । उपासक आणि नित्य नेम । तैसा निजभक्त आणि राम । देती क्षेम एकमेकां ॥ ४२ ॥ कां आयुष्य आणि सुधारस । साकर गोडी भिन्न नसे । कां वासरमाण आणि प्रकाश । एकमेकांस मिळती॥४३॥ अब्जिनी आणि सूर्यकिरणें । माता आणि बाळक तान्हें । चंद्रचकोरांचे मिळणें । आनंदासी उणे मग काय ॥ ४४ ॥ मज गांजिलें नानारीती । तयांसी मोक्षपद दिधलें अंतीं। परी भक्तद्वेषियासि निश्चिती। अधोगती चुकेना ॥४५॥ कोणे प्रकारे भक्त वैष्णवां । त्रास माझ्या भक्तासि द्यावा । मग त्याचा माझा लागला दावा । वैरभाव न चुके ॥ ४६ ॥ जैसा चंद्र आणि शीतळपण । अमृत आणि स्वाद जाण । तेवी देव आणि भक्त दोघेजण । एकत्रपणे असती॥४७॥ नातरी तीर्थ आणि जळ । मुक्ता आणि त्यांचा ढाळ । तैसे देवभक्त समरस केवळ । नव्हेति वेगळे सर्वथा ॥ ४८ ॥ जैसा देव तैसेचि भक्त । यांसी भिन्न भेद नाही किंचित । जैसे अमरत्व आणि अमृत । यांलागी द्वैत असेना ॥ ४० ॥ अवकाश आकाश जाण । वायु आणि चंचलपण । तैसे देवभक्त दोघेजण । नामाभिधाने वेगळाली ॥ ५० ॥ गंगा भरोनि वाहतां त्वरित । परी बेटापासी दोन भाग होत । दोन सरिता लोकांसि दिसत । परि तेथे द्वैत असेना ॥ ५१ ॥ ते आदिअंती एकचि जाण । मध्ये प्रवाह दिसती दोन । दर्शनस्पर्शने तत्समान । करी पावन जगासी ॥ ५२ ॥ तेवीं जगदुद्धारास्तव निश्चिती । देव भक्त नामें धरिती । परी तयां भेद नाहीं चित्तीं । अनुभव संती घेतला ॥५३॥ दर्पणासमोर मांडिला आरसा । त्यांत न दिसे स्वरूपठसा । भक्तावांचुनि मी तैसा । सप्रेम आशा खुंटली' ॥ ५४ ॥ यो निक -संतविजय.