पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग्याचे वाटेकरी । निजभक्ताच जाण अधिकारी । त्यांचिया जीवींचें झडकरी । -मीचि एक जाणता ॥ २४ ॥ माझे जीवींचिया खुणा । भक्तावांचूनि न कळती जाणा' । ऐसें रुक्मिणीसी वैकुंठराणा । सद्गद होउनि सांगतसे ॥ २५ ॥ - 'चातक वसे भूमंडळी । परी त्याचे लक्ष मेघमंडळी । कमळिणी राहिल्या जसरोवरी । परी भास्करावरी मन त्यांचें ॥ २६ ॥ की धेनु चरत असतां 1 डोंगरी । तिचें चित्त वत्सावरी । किंवा मन ठेवोनि द्रव्यावरी । कृपण बाजारी हिंडतसे ॥ २७ ॥ की कुंभ घेउनि शिरावरी । मोकळ्या हाती चालती नारी । लक्ष ठेवूनि दुडियेवरी । लोकाचारी बोलत ॥ २८ ॥ कां चित्त ठेवून पुष्पावर । मिलिंद आकाशी करित गुंजार । तेवीं बाह्यात्कारे करूनि संसार । अंतरी श्रीधर असावा ॥ २९॥ ॥ सर्व भावे विठ्ठल चित्तीं । रूप पहावें सर्वा भूती। रज तम टाकूनि निश्चिती । सप्रेमचित्ती असावें ॥ ३० ॥ असंग होउनी एकट । सत्वशीळ ज्ञानी सुभट । सप्रेमभक्ति एकनिष्ठ । तेचि श्रेष्ठ म्हणावे ॥ ३१॥ निजभक्त आवडती माझिया जीवा । भक्त ज्ञानियांचा विसावा । भक्त माझे सुखाचा ठेवा । असोंदे ठावा तुजलागीं ॥ ३२ ॥ माझिया भाग्याचे भूषण । है निजभक्त असती सुजाण । भक्तचि माझें गुणनिधान । सर्वदा आधीन मी त्यांचे 1॥३३॥ भक्तचि माझी यशकीर्ति । भक्तचि माझी सुखमूर्ति । भक्त भेटतां हो सकळ पूर्ती । मनकामना माझिया ॥ ३४ ॥ मज आणिक भक्तां वेगळिक । कल्पांतीही नव्हे देख । माझे भजनाचे निजसुख । भक्तचि एक जाणती ॥३५॥ हामी भक्तांचे नाम घ्यावें । तयांचे रूप मनी ध्यावें । भक्तसुख दृष्टी पहावें । वेळोवेळी निजप्रीतीं ॥ ३६ ॥ भक्ती माझे चिंतावे चरण । त्यांनी माझेच गावे गुण । निष्कामबुद्धि माझें भजन । तेचि करिती सर्वदा ॥ ३७॥ धर्म अर्थ काम मुक्ति चारी। देतां भक्त न घेती करीं । संसारओझें मजवरी । भक्त न घालिती सर्वदा ॥ ३८ ॥ मी भक्ताचें अंतर । भक्त सोयरे माझे निधार । का मजहूनि भक्त उदार । दिसती चौसार मज दृष्टीं ॥ ३९ ॥ की पिपीलिकेचे मार्गाने । पिपिलिकाच चालू जाणे । तेवीं वैष्णवांच्या मनींची खुण । भाविका