पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७) लाजेसि आपतन । हरपलिया द्वैतभान । लज्जा पूर्ण निमाली ॥ ८॥ उन्मत्ताचेपरी जाण । निर्लज्ज करी कीर्तन । तेणें कीर्तनें सदा आपण । करी कीर्तन तालछंदें ॥ ९ ॥ जो मोल वेचून मद्यासी। सवें सेवी विषय विलासी । तो विसरे देहभावासी । द्वैत त्यासी भासेना ॥ १०॥ उन्मादरस विचित्र । मेळवूनि केले । एकत्र । त्याचा केवढा बडिवार । क्षणे संसार विसरवी ॥ ११ ॥ सकळ रसाचें रसपान । जे गोडियेमाजी होती निमग्न । तो ब्रह्मरस सेविलिया जाण । संसारभान केविं उरे ॥ १२ ॥ ऐसे ब्रह्मरस महायोगें। जगी मद्भक्त दाटुगे । कळिकाळातें जिगोनि वेगें। नामबळे जग उद्धरती ॥ १३ ॥ चारा घालोनि मुखाआंत । जेविं पक्षिणी पिली पोशित । तेविं आपुले निजभक्त । रक्षी भगवंत अहर्निशी ॥ १४ ॥ विघ्न नयेचि नामापाशीं । तें केविं ये भक्तापाशीं । भगवंत रक्षी अहर्निशी । विन्न भक्तांसी निर्विन ॥१५॥ विघ्न करूं ये । छळणार्थ । विनांचा आत्मा तो भगवंत । विन्न निर्विन होय तेथ । भूतें भगवडप भक्तासी ॥ १६ ॥ सर्व भूती भगवद्भाव । तेथें विघ्नासी कैंचा ठाव । विघ्नाविनत्वा अभाव । विघ्न खयमेव देव झाला ॥ १७ ॥ यथासामर्थ्य जयथावित्तें । चित्ते भावार्थे जीवितें । सुख द्यावें प्राणिमात्रातें । हेचि निश्चितें निजभजन ॥१८॥ भलतेयासी भलते योनी । भलतेनि प्रकारे करुनी । सुख प्राणिमात्रालागोनी । द्यावें अनुदिनी हेंचि भजन ॥ १९॥ मेळवूनि 1 षोडशोपचार । प्रतिमा पूजितां साचार । स्वयें सुखावेना शंकर । तेवी चराचर पूजिलिया ॥ २० ॥ मुख्य पूजेचे आयतन । प्राणिमात्रा सुखदान । बाह्य विधीचे प्रतिपाळण । प्रतिमा जाण लौकिक ॥ २१ ॥ ios माकोसीमा -भावार्थरामायण. महीपतिः- ओव्या. ऐकूनि म्हणे जगजीवन । 'तूं सत्यचि बोललीस वचन । परी भक्तावांचून एक क्षण । मजकारणे कंठेना ॥ २२ ॥ मी अव्यक्त निराकार जाण । भक्तांलागून झालों सगुण । माझे भक्तांस वैकुंठस्थान । बैसावया निर्मिलें ॥ २३ ॥ माझिया