पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परब्रह्म ॥ २३ ॥ नामें दूषण होय भूषण । नामें पापी अतिपावन । नाम स्मरत्या यम शरण । नाम परिपूर्ण परब्रह्म ॥ २४ ॥ नामासी नाही कर्मबंधन । वेगळ्या कर्मा नामस्मरण । अच्युतनामें कर्म पावन । हे स्मृतिवचन श्रुत्यर्थे ॥ २५ ॥ नामासी नाही अनाध्यावो । नामासी नित्य स्वाध्यावो । नाम परब्रह्म खयमेवो । नाम निर्वाहो सभाग्य ॥ २६ ॥ नाम चैतन्याचा मुढा । नाम परब्रह्माचा हुडा । - ब्रह्म नामाचिया पुढां । नाचे घडघडा स्वानंदें ॥ २७ ॥ नामें नरकी उद्धरती । भानामें स्वर्गस्थांसी मुक्ति । ब्रह्मादिक अमरपात । जन्म वांछिती कलियुगीं ॥२८॥ । कलियुगाची थोर ख्याति । नामासाठी लाभे युक्ति । स्त्रियादि अंत्यज उद्धरती । नामकीर्ति दाटुगी ॥ २९ ॥ नामासी नाही स्नानबंधन । नामासी नाही । विधिविधान । आसनी भोजनी शयनी जाण । नाम पावन हरीचें ॥ ३० ॥ निदसुरा निजसेवेसी । नामस्मरण जयापासी । ब्रह्मादिक वंदिती त्यासी । चहु मुक्तीसी माहेर ॥ ३१ ॥ नामें निर्मुक्त महादोषी । वोस वस्ती यमलोकासी । येथे मरती उपवासी । यमनियमेसी लंघनें ॥ ३२ ॥ नाम गजरेंचि निर्मुक्त । वही पाहे चित्रगुप्त । कोरी पाने अवघी तेथ । कर्मनिर्मुक्त हरिनामें ॥ ३३ ॥ -भावार्थरामायण, वामन: श्लोक. । नामें स्फुरे तनु समग्र मनांत जेव्हां, । मंदाकिनी पदनखांत दिसेल तेव्हां ॥ 1 व्यापूनि नाम असणार समस्त अंगा, । त्याची कसी सरि करी चरणांबुगंगा. ॥३४ धारा -नाममहिमा. हरिपण हरिनामें धातुमूर्तीस आले, । हरिमय हरिनामें विश्व संतांसि झालें, ॥ भवभय हरिनामें साधकांचे पळाले,। वद, वद, वद, जिव्हे ! रामनामें रसाळे.॥३५ निगमहि हरिनामें गर्जती वर्णवर्णी, । पतित तरति नामें आश्रमी आणि वर्णी ॥ हरिपदि हरिनामी जेविं मुद्रा सुवर्णी; । जगिं कवण असा ? जो नाममाहात्म्य वर्णी ३६ आकाश-अंत न कळोनिहि अंतरिक्षी । आकाश आक्रमिति शक्त्यनुसार पक्षी; ॥ नामप्रतापहि यथामति याच रीती, । सीमा न पावति, तथापि मुनींद्र गाती. ॥३७ मोक्ष श्रुती वदति ज्यास गुणप्रसादें,। तो पावतो सगुण नामसुधानुवादें; ॥ .