पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३) श्रीधर:- ओव्या.rani या श्रीरंगाचे करितां स्मरण । यातुल्य तप दुजें आन । नसे शोधितां त्रिभुवन । परम पावन नाम देखा ॥८॥ आणिक अष्टादश पुराणें । बोलिली सत्यवतीहृदयरत्नें । परी नामाहूनि विशेष साधनें । सर्वथाही नव्हतीं ॥९॥ पापतल्लक्षण हस्ती । याची तोवरी जाणिजे मस्ती । नामसिंहप्रतापकीर्ति । ऐकिली नाहीं जोवरी ॥ १०॥ ऐकतां नामसिंहप्रतापा । पळ सुटे मत्त मातंगपापा । लपावया न मिळे खोपा । गतप्राण होती तेव्हांचि ॥ ११॥ पाप जळावया समस्त । हरिनाम अग्नि धडाडित । क्षणे दुरितकाष्ठं जाळित । प्रताप अद्भुत न वर्णवे ॥ १२ ॥ नामानीने न जळे । ऐसें पाप कोणी नाही केलें । वाल्मीके बहुत पाप जोडिलें । परी नाही उरलें नामापुढें ॥१३॥ गणिका आणि अजामिळ । इहीं दोष केले कल्होळ । परी नामाचे अद्भत बळ । जाळी सकळ क्षणार्धे ॥ १४ ॥ -हरिविजय. एकनाथः ओव्या. नामापासी भक्तिमुक्ति । नामापासीं यश कीर्ति । नामापासी विजयप्राप्ति । कर्मनिर्मुक्ति हरिनामें ॥ १५ ॥ नामापासीं नित्य निवृत्ति । नामापासीं नित्य शांति । नाम वंदिजे सर्वांमतीं । ब्रह्मप्राप्ति हरिनामें ॥ १६ ॥ जो सप्रेम स्मरे नाम । त्याअधीन पुरुषोत्तम । नामें संतुष्ट आत्माराम । भक्तकाम कृपाळू ॥ १७ ॥ विस्मरणे अपेशप्राप्ती । विस्मरणीं नित्य अपकीर्ति । विस्मरण स्वयें पापमूर्ति । नरकप्राप्ती विस्मरणे ॥ १८ ॥ नामस्मरण परधर्म । नाम निर्दाळी कर्माकर्म । नाम केवळ परब्रह्म । पुरुषोत्तम हरिकीर्ति ॥ १९ ॥ ज्याचे मुखीं नामस्मरण । विघ्न त्याचे वंदी चरण । कळिकाळ खये आपण । नित्य नमन त्यासी करी ॥२०॥ स्मरणी नाही द्वंद्वबाधा । स्मरणें नाशे सकळापदा । छेदोनियां द्वंद्वाचिया कंदा । परमानंदा पाविजे ॥२१॥ नामापासी विरक्ति शांति । नामस्मरण परम भक्ति । नामापासीं चारी मुक्ति । नामें निश्चिती परब्रह्म ॥ २२ ॥ नामासी नाही कर्मबंधन । नाहीं नामासी विधिविधान । अबद्ध नाम अतिपावन । नाम परिपूर्ण