पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२) माया गंगाच वाहे स्थिर चर अवघे श्रीहरीतोंच साहे; । हे जाणे तो न मोहे क्रमविहित गुण स्वामिचे सा नमो हे. ॥ ७ ॥ ऐश्वर्य सामर्थ्य गुणें सुजाणा; । ज्ञानत्व बोधेचि विराग जाणा; ॥ वैराग्यहेतुस्तव धर्मसिद्धी; । धर्मे यशःश्री अशि हे प्रसिद्धी. ॥ ८॥ अधर्म तो, जो करि बंधनासी; । तो धर्म की जो भवबंध नासी; ॥ करूनि सृष्टयादिकही विरागी । धर्मिष्ठ तो भक्त जनानुरागी. ॥ ९॥ सत्कर्म आणि समता सदयत्वरीती, । हा मुख्यधर्म निगम स्फुट हे करीती; ॥ वैषम्यनिर्दयपणाविण लोक सारे । झाला स्वयें धर्महि तो असा रे! ॥ १० ॥ -गीतार्णवसुधा. २. हरिनाममाहात्म्य. महिपतिः ओव्या. नाम जाणावें सर्वकाळ । नलगे तोंडधुणे आंघोळ । नामधारक त्याच्याजवळ । तीर्थे सकळ राहती ॥१॥ जप तप अनुष्ठानें । सर्वही घडती नामस्मरणें । नामस्मरणी त्यासी न बाधती विघ्ने । जगज्जीवन निवारी ॥२॥ विष घेतले कैलासरमणे । तेव्हां सर्वांगाचे जाहलें दहन । गंगा मस्तकी धरिली जाण । परी शीतळ तेणे नव्हेचि ॥ ३ ॥ मग अनुताप धरोनियां पोटीं । म्हणे व्यर्थचि वाउगी सकळ गोष्टी । राम राम उच्चारितां शेवटीं । शीतळ धूर्जटी जाहला ॥ ४ ॥ कुंटिणी सकळ पातकांची राशी । राघोबा म्हणतां शुकासी । देवें विमान पाठविले तिसी । वैकुंठासी मग नेली ॥ ५॥ अजामिळ ब्राह्मण निश्चित । तो वृषलीशी जाहला रत । पुत्रमिषे नारायण स्मरत । तोही त्वरित उद्धरिला ॥ ६ ॥ वाराणसी ही मुक्तिपुर। तेथें नाम उपदेशी विश्वेश्वर । तेणें जीवांचा होय उद्धार। अन्य विचार असेना ॥ ७ ॥ Comm u -संतविजय.