पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लेखन प्रकरणही इतिवृत्त, मानपत्र, वृत्तलेखन या नित्याच्या सामोरे जावे लागणान्या लेखन-प्रकारांच्या संदर्भात मार्गदर्शक झाले आहे. या शिवाय पत्र, संवाद, दैनंदिनी, टीपा; टिप्पणी, जाहिरात, मुलाखत, रूपक, अनुवाद, दृकश्राव्य माध्यमांसाठी लेखन इत्यादी विषयांच्या विविध लेखन प्रकारांच्या संदर्भात मार्गदर्शन देणारा या पुस्तकाचा पुढील भाग लिहून पूर्ण करावयाचाही प्रस्तुत लेखकाचा संकल्प आहे. तोही ते पूर्ण करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. या पुस्तकाची उपयुक्तता लक्षात घेऊन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रकाशन उत्तेजन योजनेनुसार प्रकाशनासाठी संस्थेने ५०० रु. अनुदान व ५०० रु. कर्जाऊ रक्कम मंजूर केली आहे. मराठी शुद्धलेखनासाठी हे पुस्तक शालेय, महाविद्यालयीन, वृत्तपत्र विभागाचे विद्यार्थी, मराठीचे अभ्यासक या सर्वांना निश्चित उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करून पुढील भागाच्या प्रकाशनास शुभेच्छा व्यक्त करतो. प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी ( साहित्याचार्य) पाच