पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुभास्ते ! पुरस्कार महाराष्ट्रराज्य रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने शासनाने हाती घेतलेल्या मराठीकरणाची प्रक्रिया लक्षात घेऊन आमच्या संस्थेच्या जव्हार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भा. व्यं. गिरधारी यांनी व्यवहारोपयोगी मराठी पुस्तक लिहून पूर्ण केले ही गोष्ट खचितच अभिनंदनीय आहे. साहित्याच्या आवडीपोटी स्वतः होऊन आपण ललित साहित्य वाचनाचा छंद जोपासू शकतो, वाङमयाभ्यास करू शकतो. त्यासाठी कला शाखेतील शिक्षणाची मुद्दाम वेगळी आवश्यकता नाही. परंतु प्रत्यक्षात उपयोजित मराठीच्या (Functional Marathi) मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. मराठीमध्ये मसुद्यासह तयार फायली अद्याप कार्यालयात तयार होत नाहीत. त्यामुळे परंपरेने चालत आलेले इंग्रजी ड्राफ्टींग अनेकांना सोपे वाटते. साभिप्राय मराठी शब्दांची निवड करणे काहीसे कठीण होऊन बसते. म्हणूनच अशा प्रकारच्या पुस्तकांची निर्मिती या प्रक्रियेला हातभार लावणारी होऊ शकते. " मराठी शुद्ध लेखनाचा मार्ग " या पुस्तकात डॉ. भा. व्यं. गिरधारी यांनी मराठी शुद्धलेखनाचे नियम, नेहमी होणाऱ्या चूका लक्षात घेऊन पुरेशा उदाहरणासह समजावून दिले आहेत. सार, आस्वाद, वृत्तात, निबंध लेखन यांचे शास्त्रशुद्ध व्यासंगी, विवेचन केले बाहे. “अल्पाक्षर रमणीय हा संस्कृत भाषेचा विशेष मराठीलाही आत्मसात करण्याची आवश्यकता लक्षात आणून दिली आहे. frase, अर्थपूर्ण, थोडक्या शब्दांत आपले म्हणणे मराठीतून मांडता आले पाहिजे. त्यासाठी सारलेखन हे प्रकरण अभ्यासनीय झाले आहे. वत्तांत- चार