पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आदरणीय डॉ. राजाभाऊ गायधनी यानी या ग्रंथास प्रस्तावना लिहिली. साहित्याचार्य प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी, सेक्रेटरी, गोखले एज्युकेशन सोसायटी यांनी पुरस्कार लिहून व अनुदान देऊन उपकृत केले आहे. त्यांच्या ऋणातच मी राहू इच्छितो. या लेखनाचे अन्य स्वरूपात प्रकाशन करणाऱ्या 'शिक्षण संक्रमण' या नियतकालिकाच्या संपादकांचे, त्याचप्रमाणे सार्वजनिक वाचनालय, नाशिक. आमच्या संस्थेची वाचनालये यांच्या साहाय्याबद्दल मनःपूर्वक आभार मानतो. आमचे सम्मित्र मे बी: वाय्. प्रेसचे संचालक श्री. अनिल क्षत्रिय यांनी अत्यंत किचकट मराठी शुद्धलेखनाचे काम स्वीकारून अचूक छापण्याचा निर्धार आणि उत्साह व्यक्त केला तो स्तिमित करणारा आहे. त्यांचेही मनःपूर्वक आभार. मराठीच्या अभ्यासकांना, मुद्रणशोधकांना, पत्रकार बंधूंना या लेखनाचा उपयोग होईल अशी खात्री आहे. पुणे व एस्. एन्. डी. टी. विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व मराठी विभागातील माझ्या सर्वच विद्यार्थ्यांची या लेखनामागे प्रेरणा आहे हे मी सद्भावपूर्वक नमूद करतो आणि हे पुस्तक माझ्या विद्यार्थ्यांनाच अर्पण करतो. प्राथमिक व माध्यमिक विद्यालये, ज्येष्ठ व कनिष्ठ महाविद्यालये यातील मराठीचे तसेच हिंदी, इंग्रजी व अन्य भाषांचे अभ्यासक, वृत्तपत्रविद्या विभाग व मुद्रणकला विभाग, सर्व शिक्षक विद्यार्थी व मराठीचे जाणकार यांना या पुस्तकाचा विशेष लाभ होईल, म्हणून यंदाच्या रौप्यमहोत्सवी महाराष्ट्र दिनाच्या सुमुहूर्तावर हे प्रकाशन सविनय सादर करीत आहे. दिनांक १ मे, १९८५ भा. व्यं. गिरधारी तीन