पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• विशाल व व्यापक अर्थ प्रकट करतात. हे सारे मर्मज्ञ रसिकाने जाणून काव्यातील व्यंगार्थयुक्त शब्दांकडे पाहिले पाहिजे कारण या शब्द- संहतीतच काव्यार्थ भरलेला असतो. १०) ही शब्दबंधांची घडण कवितेला, तिच्या घाटाला डौल आणि सौष्ठव प्राप्त करून देते, शब्द प्रतीकांचा अभ्यास हवा. ११) काव्य हा भावनांचा आविष्कार असतो म्हणून शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श या पंचज्ञानेंद्रियांच्या आधारे या संवेदना रसिकाला जाणवायला हव्यात. रसिकांच्या हृदयात शब्दसंलग्न संवेदना संक्रांत होऊन निर्माण होणाऱ्या सहसंवेदनांची अभिव्यक्ती म्हणजे आस्वाद-लेखन होय. गद्य सौंदर्य गद्याचे प्रमुख वैशिष्ट्य वा लक्षण विचारसंपन्नता होय हे एकदा लक्षात घेतल्यानंतर गद्य उताऱ्याचे आस्वाद-लेखन करताना - प्रथम विचारसौंदर्य लक्षात घेतले पाहिजे. या अनुरोधाने इतर गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण ' Prose is like a walking & Poetry like a dancing' असे म्हटलेले आहे. गद्य उताऱ्याचे आस्वाद-लेखन करताना पुढील गोष्टींचा कटाक्षाने विचार करावा : १) गद्य उतारा व्यवस्थित समजण्यासाठी दोन-तीनदा वाचावा. २) त्या गद्य उताऱ्यातील विचारांचे सूत्र लक्षात घेण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे एकूण आशयही ध्यानात घ्यावा. ३) गद्य सुद्धा प्रतिभावंत लेखकाच्या मनाचा मुक्त आविष्कार आहे. त्यादृष्टीने लेखकाच्या अनुभवाचा, व्यक्तिमत्त्वाचा, घ ६३