पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म्हणता येईल. अनुभवाच्या गरजा ओळखून काव्यात भाषा यावी लागते. आशयाला सरळ जाऊन भिडते ती खरी भाषाशैली, मग ते बालगीत, ग्रामीण गीत किंवा कोणत्याही काव्यप्रकारांतील लेखन असो. अंतःकरणाची पकड घेणारी, मनाला स्पर्शन जाणारी कल्पना चमत्कृतींनी युक्त रचना इत्यादी गोष्टी काव्यातील सौंदर्याचे दर्शन घडवितांना लक्षात घ्याव्या लागतात. तात्पर्य, एखाद्या कवितेचे मूल्पमापन करताना पुढील गोष्टी नोट लक्षात घ्याव्यात - १) कविता वाचून ती नीट समजून घ्यावी. २) कवितेची मध्यवर्ती कल्पना विशद करावी. ३) कवितेतील भावना, विचारसौंदर्य लक्षात घ्यावे. ४) कवितेतील लय, चाल, शब्दसौष्ठव लक्षात घ्यावे. ५) रुबाया, गझल, कणिका, नाट्यगीत, जानपदगीत, ग्रामीण- गीत, भावगीत, आख्यानपरता, प्रेम, निसर्ग, सामाजिक, विडंबन, विलापिका इत्यादी काव्यप्रकार यांचाही विचार करावा. ६) कवितेतील प्रतिमांचा विचार आशयसंदर्भात करावा. ७) योग्य त्या ठिकाणी पुराव्यादाखल काव्यपंक्ती वा शब्द- रचना नेटकेपणाने उद्धृत करावी. ८) कविता वाचून आपल्या मनावर होणारा एकूण परिणाम ( total effect) सांगावा. प्रामाणिकपणे आपली प्रतिक्रिया नोंदवावी, ९) कवी आपल्या मनातील आशयाला अभिव्यक्त करून सौंदर्यपूर्ण एकसंध अनुभूती निर्माण करतो त्यासाठी त्याचे शब्द ६२