पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चितनाचा शोध दिलेल्या गद्य उता-यातून घेता आला पाहिजे. ४) गद्य लेखनात आपल्या खास स्वतंत्र शैलीत लेखकाने एखाद्या गंभीर सत्याचा, जीवनमूल्यांचा आविष्कार केलेला असतो. कधी खिलाडू, खेळकरवृत्ती प्रगट होते तर कधी करुण गंभीरतेचा सूर उमटतो. हे सारे व्यवस्थित समजावून घेऊन त्या आशयाच्या दृष्टीने दिलेल्या उता-यातील गद्य शैलीचा विचार केला पाहिजे. ५) शैलीचा विचार करताना अंतःकरणाला सरळ जाऊन भिडते आणि अनुभवाला साक्षात करते ती संपन्न शैली ! तिची आशया- नुरूपता ध्यानात घ्यावी. लेखकाने हे सुचविलेले असते की, 'तुम्ही माझी एक ओळ वाचाल तर हृदयाला हात घालाल !' हाच दृष्टिकोन असावा. तात्पर्य गद्य उताऱ्यातील विचार, आशय, भाषासौंदर्य, रचना- कौशल्य, कल्पकता, संवेदनक्षमता, एकूण परिणाम, सौंदर्यदर्शन या गोष्टींचा शोध घेणे म्हणजे गद्य आस्वाद- द- लेखन होय. नमुना उदाहरण : पद्य ६.४ त्रिधा राधा आकाश निळे तो हरि अन् एक चांदणी राधा बावरी युगानुयुगची मन - बाधा विस्तीर्ण भई गोविंद अन् क्षेत्र साळिचे राधा स्वच्छंद युगानुयुगी प्रियंवदा