पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एखाद्या उता-यातील जमेची बाजू दाखवितानाच काही • उणिवा वा दोष आढळल्यास त्यांचेही निर्देश करावयास हरकत नाही. मात्र लेखनातून ते सिद्ध व पुरेसे स्पष्ट व्हावे. उताऱ्यातील काय विशेष आवडले व का, तसेच काय आवडले नाही व का, हे प्रश्न स्वतः विचारले पाहिजेत आणि या प्रश्नांची उत्तरे शोधताना त्यांची सकारण यथोचित शब्दांत मांडणी करता आली म्हणजेच ते आस्वाद - लेखन होते. हे सारे संभवते याचे कारण रसिकाला माणसात, जीवनात आणि त्याचे चित्रण करणाऱ्या साहित्यात रस असतो आणि साहित्यालाही, निर्मात्यालाही माणसांचा आणि जीवनाचा कधीही न संपणारा शोध घेण्यातच स्वास्थ वाटत आलेले आहे. काव्य सौंदर्य 3 कवितेच्या आस्वादाचे विवेचन करताना श्री. मो. रा. वाळंबे यांनी कवितेतील सौंदर्य - दर्शन म्हणजेच रसग्रहण असे म्हटले आहे. काव्य वाचताना आनंद का झाला हे उलगडून सांगणे म्हणजेच आस्वाद-लेखन आणि मनाला मोहून टाकते ते काव्य ! काव्याच्या बाह्य सौंदर्यात तिची रचना किंवा चाल, नाद, कल्पना- प्रतिमांचा विलास, विचारसौंदर्य इत्यादींचा समावेश होतो. उदा. अंगाई गीतात शांत वातावरण निर्माण व्हावे अशी शब्दकळा आणि चाल असते. भूप रागात आळविली जाणारी भूपाळी सकाळच्या प्रहरीच्या मंगलमय वातावरणात कमालीचा गोडवा आणते. भावना आणि रस यांना अनुकूल अशी लय कवितेत असावी लागते, हे कवितेच्या आस्वादात पाहावे लागते. तसेच ध्वनिनादानुकारी शब्दयोजना ( उदा. 'डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये रुणझुण ये झंकारित वाळा' ) हेही एक सौंदर्यस्थळ किंवा • ६१ ,