पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- पलीकडचे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. म्हणूनच त्यांच्या जीवन- चरित्राला आपण नुसता स्पर्श केला तरी ते आपल्याला लोहचुंबकासारखे ओढून घेते. प्रा. न. र. फाटक यांनी लिहिलेल्या गोखले यांच्या चरित्राला जे आदर्श भारत सेवक' हे नाव 6 दिले आहे ते केवळ समाजाचे संस्थापक म्हणून नाही तर सर्वार्थाने गोखले आदर्श भारत सेवक' होते हे सांगण्यासाठीच ! आता या उताऱ्याचे शीर्षकासह एकतृतीयांश लेखन नमुन्यादाखल पुढीलप्रमाणे करता येईल. आदर्श भारत सेवक - समाजसुधारकाने ज्ञान, त्याग, चारित्र्य या गुणांनी युक्त असावे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे सद्गुणांनी युक्त होते. याच सद्गुणांची जोपासना करण्यासाठी आज नामदार गोखल्यांचे आपण स्मरण करणे आवश्यक आहे. L आदर्श भारत सेवक' म्हणून गोखल्यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात, अद्वितीय कामगिरी बजावलेली आहे. म्हणूनच आजही नामदार गोखल्यांच्या जीवनचरित्राचे आकर्षण वाटतच आहे. प्रा. न. र. फाटक यांनी नमूद केल्याप्रमाणे खरोखरच सर्वार्थाने ते 'आदर्श भारत सेवक' ठरतात. ० या उताऱ्यात एकूण शब्द सुमारे १५० होते आणि ओळी २१ होल्या. त्याचा एक तृतीयांश म्हणजे ५० शब्द आणि ०७ ओळी असे सांगता येईल. हे मनाशी योजून ठेवले व त्याबेताने दिलेल्या मार्गदर्शनानुसार उताऱ्याचे सारलेखन येथे केले आहे. आणि त्यातूनच 'आदर्श भारत सेवक' हे समर्पक शीर्षक शोधले आहे. ५५