पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिच्छेद कोणते, त्या परिच्छेदातील मुद्दे कोणते, उता-यातील एकूण मुद्दे कोणकोणते हे पाहिले की सारलेखन सुलभ होते. नमुना म्हणून सारलेखनासह उतारा येथे पुढे दिला आहे. नमुना उतारा व त्याचे सारलेखन ज्ञान, त्याग आणि चारित्र्य या गुणांची कोणत्याही समाज- सुधारकाला आवश्यकता असते, नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना हे गुण उपजत अवगत होते व म्हणून गोखल्यांचे स्मरण केवळ औपचारिकपणे न करता त्याचे सद्गुण आज खरोखरीच प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे. महात्मा गांधींनी गोखल्यांना गंगेची उपमा दिली आहे. संथ वाहणा-या या जीवनगंगेत सुस्नान करून आपण पवित्र व्हावे. • गंगेपेक्षा महासागराची उपमा गोखल्यांना विशेष शोभून दिसेल ' असे गोखल्यांच्या जीवनाचे जवळून दर्शन घेतलेल्या चंदावरकर यांचे उद्गार आहेत. आपल्या वयाच्या अवघ्या एकोणपन्नास वर्षाच्या आयुष्यात एक फार मोठे समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, राजकीय क्षेत्रातील अधिकारी पुरुष म्हणून आपल्या अद्वितीयत्वाने गोखले चमकले. त्यांची सारी जीवनभराची सेवाही अद्वितीयच होती. तो त्यांचा जन्मजात स्वभावच बनला होता. एकही क्षेत्र असे नाही की ज्यात त्यांनी सेवा केली नाही. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गणेश व्यंकटेश जोशी, सार्वजनिक काका, दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर या सर्वांपेक्षा गोखले वयाने लहान होते, पण सामाजिक कार्यातील निष्ठा आणि कर्तबगारी याबाबतीत ते मुळीच कमी नव्हते. मानवनिर्मित भेदा- ५४