पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिलेली असतील तर सारलेखनात त्यातील फक्त एक / दोन निवडली तरी चालतील. एखादी कल्पना जर भिन्न शब्दांतून आलेली असेल तर पुनरुक्ती टाळली पाहिजे. मग तुमचा आवश्यकतेपेक्षा थोडा पसरट, तपशीलवार सारांश तयार होईल. जेव्हा आपण अंतीम मुद्दा लिहून तयार करू तेव्हा थोडी लांबी कमी केली पाहिजे. अत्यावश्यक तपशील स्वीकारून असंबद्ध तपशील वगळला याची खात्री झाली की मग हा सारांश तुमच्या शब्दांत लिहिला पाहिजे. ५) पहिल्यांदा सारलेखनाच्या उताऱ्यातील शब्द मोजावेत. सामान्यपणे नेहमीच १/३ संक्षेप करण्यास सांगितलेले असते. मूळच्या उता-यातील संक्षेपासाठी किती शब्द योजिले पाहिजे ते प्रथम ठरवावे. जर आपले सारलेखन कमी पडत असेल तर तुम्हाला महत्त्वाचे वाटणारे मुद्दे तुम्ही पुनश्च समाविष्ट करू शकाल, जर तो सारांश फार मोठा होत असेल तर त्याची लांबी कमी करण्यासाठी तुम्ही कमी महत्त्वाच्या कल्पना वगळाव्यात किंवा नवी शब्दयोजना करून वाक्यांची पुनर्रचना करावी. > ६) लिहिलेला सारांश एकदा वाचावा. त्यात काही वाक्य- रचनेचे, शब्दयोजनेचे दोष वा काही शब्द शुद्ध - अशुद्ध आढळल्यास, सुधारणा, फेरबदल करावेत. ७) यानंतर सारलेखनाचे अंतिम लेखन करावे. सारलेखन करताना दोन गोष्टी मुख्यतः टाळाव्यात. अ) मूळ उता-यातील वाक्ये पुन्हा जशीच्या तशी देऊ नयेत. ब) आपण स्वतःच्या पदरचा तपशील त्यात समाविष्ट करू नये. उतारा वाचून उता-याचा विषय काय, त्यातील महत्त्वाचे ५३