पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकदा उतान्याचा संपूर्ण मजकूर लक्षात आल्यानंतर मग योग्य तो मजकूर ठेवून व नको तो मजकूर वगळून सारलेखन करता येते. त्यात सर्व महत्त्वपूर्ण मुद्दांचा समावेश झालेला असतो. तात्पर्य : सुजाण वाचन आणि लेखन यांचा सराव सारलेखनाने होतो. सारांश वा सारलेखनाच्या पायऱ्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे दर्शविता येतील. १) उतारा आरंभापासून अखेरपर्यंत वाचून काढावा. त्यातील एकूण आशय समजून घ्यावा. एकदा वाचून आशयाचा उलगडा झाला नाही तर तो उतारा पुन्हा दुसऱ्यांदा वाचावा. आता उताऱ्याचा विषय काय आहे हे आपल्याला सांगता येईल. त्या विषयाचा विस्तारही सांगता येईल. उतान्यातील एकूण कल्पना अल्प व मोजक्या शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचवेळी आपण उतान्याला सुयोग्य व समर्पक शीर्षक देण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. एकूण आशयाची समग्र कल्पना देणारे शीर्षक असले पाहिजे. आशयाचीही त्यामुळे चांगली कल्पना येईल. २) आता पुनः ओळीनिशी उतारा काळजीपूर्वक वाचावा. त्यातील नवीन शब्दयोजना लक्षात घ्यावी. ३) उतान्यातील मुख्य मुद्दे क्रमाने लिहावेत. ४) उपरोक्त गोष्टींची टिपणे तयार झाल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दांत सारलेखन करू शकाल. या सारांशात आता तुम्ही अन्य सर्व तपशील विचारात घेण्याचे कारण नाही. फक्त महत्त्वाचा तपशील निवडूनच सारांशात घ्यावयाचा आहे. जर उतान्यातील एखाद्या विधानाच्या समर्थनासाठी भरपूर उदाहरणे ५२