पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाक्यातील मुख्य आशयात कोणतीही भर न घालणाऱ्या शब्दांना व पुनरुक्तीला गाळून लांबी कमी करावी लागते, अर्थात सारलेखनात अशी केवळ लांबी कमी करणे अपेक्षित नाही. एकाच परिच्छेदात अनेक संबद्ध, संलग्न कल्पना असल्यास त्यातील फक्त महत्त्वाच्या कल्पना ठेवून अन्य कभी महत्त्वाच्या काढून टाकाव्यात. मात्र परिच्छेदात महत्त्वाचे काय आहे हे जाणले पाहिजे. याचे उदाहरण म्हणून पुढील वाक्य पहा - 'आज आपल्या समाजात धडे व मुंडको दूरवर पडलेली आहेत. धडाला मुंडके नाही वा मुंडक्याला धड नाही.' या प्रतिकात्मक लेखनातील आशय फक्त सारलेखनात लक्षात घ्यावा. येथे लेखकाला बुद्धिजीवी व श्रमजीवी यातील विभक्तपणा सूचित करावयाचा आहे. परिच्छेदातून हाती आलेले मुद्दे पूर्ण वाक्यात आपण लिहावेत. प्रत्येक परिच्छेदातील मुख्य मुद्दे अनुक्रमाने लिहावेत म्हणजे संपूर्ण उतान्याचे सारलेखन तयार होईल. संक्षेप-लेखन करण्यापूर्वी उतारा वाचून नीट कळला पाहिजे. त्या उता-याचा विषय कोणता असून त्यात काय सांगितले आहे हे प्रथम समजले पाहिजे. उता-याच्या आशयाची एकूण कल्पना आल्यानंतर मुख्य मुद्यांचा शोध घेण्यासाठी उतारा पुन्हा वाचला पाहिजे. मुख्य मुद्दे मिळण्यासाठी एकेक वाक्य काळजीपूर्वक वाचावे लागेल, तेही अनुक्रमाने. त्यातील तपशील - आशयावर लक्ष केन्द्रित करावे लागेल. काही शब्द वा वाक्प्रचारांचा अर्थ न उलगडल्यास समजून घ्यावा लागेल. त्या सरावाने तुमचा शब्द- • संग्रह वाढेल. त्यातील काही शब्द आशयाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील. [ ५१