पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तात्पर्य, सूळ उतान्यातील महत्वाचा विचारधागा पकडून उतारा, पुरेसा स्पष्ट करणारे संक्षिप्त लेखन म्हणजेच सारलेखन होय... उताऱ्यातील प्रतिपादनाची केलेल्या सारलेखनातून नीट कल्पना करता आली पाहिजे.: संपूर्ण उताऱ्याचे मर्म त्यासाठी लक्षात घेतले पाहिजे. उतान्याचा विषय, प्रतिपादनाचा सेख, लेखनशैली इत्यादी गोष्टींचे अवधान ठेवावे. सारलेखनाचे हे विवेचनसूत्र पुढील ११: मुद्यांच्या आधारे सांगता येईल. त्याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. : १) दिलेल्या उताऱ्याचे सारलेखन करताना तो उतारा नीट लक्षात येईपर्यंत वाचून त्याचे सार कमीत-कमी शब्दांत सांगितले पाहिजे. २) सारलेखन करताना दिलेल्या गद्यांशातील मुख्य आशय आणि विचार व्यक्त होणे आवश्यक असते. १ ३) सारलेखनात अनावश्यक तपशील गाळावयाचे असतात. ४) सार देतांना मूळ उतान्यातील प्रतिपादन स्वच्छ व निर्लेप- पणे पण संक्षेपाने सांगितले पाहिजे. ५) सारलेखनात मूळातील पाल्हाळ, ऐसपैसपणा गांळून टाकणे जसे आवश्यक आहे. तसेच अल्पाक्षर रमणीयत्व, मोजकी शब्द- योजना, नेटकेपणा, असंदिग्धता या विशेषांनी युक्त अशा गद्य शैलीतही अचूकपणे आशय समजावून घेतला पाहिजे. 2 ६) सारलेखनाचे वाचन कसे केले पाहिजे याची जाण येण्या- साठी. सराव आवश्यक आहे. वाचन कसे करावे याची, सारलेखन ही एक कसोटी आहे, पडताळा आहे. अनेकदा आपण बेपर्वाईने,