पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिलेल्या उताऱ्यातील एकही महत्त्वाचा मुद्दा न गाळता समग्र आशय साररूपाने मांडला जावा, गोवला जावा ही अपेक्षा येथे असते. हा संक्षिप्त वा सार रूपाने मांडला जाणारा आशय म्हणजे केवळ गोळाबेरीज नसावी, तर मुद्देसूदपणे, सलगपणे लिहिलेला तो एक छोटेखानी परिच्छेद झाला पाहिजे. त्यात वाचणान्याला आपण शैलीदार गद्यबंध वाचीत असल्याचा प्रत्यय आला पाहिजे. परस्परांशी संकलित विचारसूत्रे एकजीव करून साध्या, सोप्या. सहज बोलीभाषेत स्वतःच्या खास शैलीत, नेटकेपणाने व काटेकोरपणाने सारलेखन करता आले पाहिजे.

मूळ परिच्छेदातील संपूर्ण आशय स्वतःचा नवा परिच्छेद लिहून अगदी थोडक्यात सांगणे याला सारलेखन असे म्हणतात. अशा लेखनात मूळ उताऱ्यातील भाषेची सजावट, उदाहरण. विषयांवर संबंधित संलग्न पण दुरान्वित कल्पना, विधाने हे सारे बाजूला सारले पाहिजे. मात्र हे सारे करीत असताना मूळ उता-याच्या आशयातील कमी-अधिक महत्त्व असलेल्या विचाराना धक्का लागणार नाही याचे भान ठेवले पाहिजे. अनावश्यक गोष्टी, अलंकारिकता, विशेषणे, दृष्टान्त टाळावेत हे सारे वगळीत असताना मुद्यांचा क्रम बदलला तरी चालेल. पण त्यांत मूळ उता-यात ज्या मुद्यावर अधिक भर असेल त्यावरच अधिक भर असला पाहिजे. विचारांची स्पष्टता, स्वच्छता (Clarity of thought) त्यात असावी. त्यात मूळ उताऱ्यातील पुनरुक्ती नसावी. प्रत्यक्ष संभाषण टाळून सारे अप्रत्यक्ष रीतीने कथन केलेले असावे. म्हणजे मूळ उतान्यात संवाद असतील, Direct speech असेल तर संक्षेपात Indirect speech असले पाहिजे. दुधाचे सत्त्व म्हणून लोणी काढावे अशी ही प्रक्रिया आहे असे या लेखकद्वयांनी म्हटलेले आहे..