पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घाईत वरवरचे वाचन करतो. यालाच 'चाळणे' असेही शिष्टसंमत नाव आहे. त्यामुळे लेखनाची, दिलेल्या उताऱ्याची नस नीट कळत नाही. उतान्यातील आशय गोळाबेरजेच्या स्वरूपातच आपण लक्षात ठेवतो. हे सारलेखनाच्या सरावाने टाळता येईल. ७) सारलेखनासाठी दिलेला उतारा नीट कळावा यासाठी तो एकाग्रतेने, मनःपूर्वक लक्षात ठेवण्याच्या भावनेने वाचला पाहिजे. ८) आपण वाचलेल्या उताऱ्यातील आशयाचे स्मरणपूर्वक, संक्षेपाने कथन करण्याची सवय मनाला लावली पाहिजे. मनाला एकाग्र होण्याची, वाचलेले लक्षात ठेवण्याची शिस्त यामुळे लागते. ९) सावधानतेने, लक्षपूर्वक वाचलेल्या उतान्यातील आशयाचे आकलन, ग्रहण, धारण करण्याची कला या सारलेखनाने साधते. याची खऱ्या चोखंदळ रसिकाला नितांत आवश्यकता असते. १०) सारलेखनाने आपले विचार निःसंदिग्धपणे, सुस्पष्टपणे आणि प्रभावीपणे संक्षेपासह मांडता येतात म्हणून ही कला अवगत असणे हिताचे आहे. ११) यासाठी सारलेखनास दिलेला उतारा दोन-तीन वेळा सावधानतेने लक्षपूर्वक वाचावा. त्या उतान्याचा विषय कोणता, लेखकाला काय नमूद करावयाचे आहे, हे नीट समजावून घ्यावे. यामुळे उता-यात काय सांगितले आहे, सांगण्याचा दृष्टिकोन कोणता आहे याची कल्पना येईल. एकाग्र चित्ताने उतारा वाचला तर मर्म ध्यानात येईल. काही वेळा वाक्य तोडून पुन्हा पुन्हा वाचून हे मर्म कळ शकेल. पण एकदा उतान्याचे मर्म हाती आले की उताऱ्याचे उत्तम आकलन झाल्यामुळे त्यातील आवश्यक, अढळ वा ग्रहणीय भागाला धक्का न लावता सारलेखन करता येईल. ४९