पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उताऱ्यातील समजलेला आशय सूत्रबद्ध रीतीने आपल्याच भाषत मांडणे म्हणजे सारलेखन होय. आकलनाच्या संदर्भात विवेचन करताना श्री. मंगळूरकर आणि प्रा... अर्जुनवाडकर यांनी आपल्या ग्रंथात कोणत्याही उतान्याला पाच अंगे असतात असे सांगितले आहे. १) विषय... २) साध्य । ३) हेतू ४) आक्षेप ५) समाधान यातील विषय, साध्य, हेतू हे तीन महत्त्वाचे घटक कोणत्याही वेच्यामध्ये किंवा उताऱ्यामध्ये आढळल्याशिवाय राहात नाहीत... तेव्हा आपल्याला सारलेखनासाठी दिलेला वेचा किंवा उतारा प्रथम दोन-तीन वेळा वाचणे आवश्यक आहे. कारण त्याशिवाय त्याचे यथार्थ आकलन होणार नाही. दिलेल्या उताऱ्यातून सर्वसाधारणपणे पुढील गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत.

"उतान्याचा आशय काय आहे, विषय काय आहे, त्या विषयाच्या संदर्भात लेखकाला नेमके काय सांगायचे आहे, या प्रश्नांच्या आधारे आपण उताऱ्यातील नेमका गाभा शोधला पाहिजे. एखाद्या उताऱ्याचे उदाहरणासहित विवेचन केलेले असल्यास आपणास त्यातील मूळ विषय अचूकपणे हेरता आला पाहिजे. त्यासाठी एक प्रतिमा सांगितली म्हणजे अधिक उलगडा होईल. सरकीभोवती भरपूर कापूस असतो. तो कापूस बाजूला सारून सरकी तेवढी हाती घ्यावयाची प्रक्रिया म्हणजेच दिलेल्या उताऱ्याचे सारलेखन होय. ४६