पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सारलेखन तात्त्विक विवेचन मराठी, हिंदी, इंग्रजी व सर्व भाषा विषयांच्या अभ्यासक्रमात सारलेखनाचा प्रश्न असतो. सारलेखन हा आपल्या सरावातील एक भाग व्हावा म्हणून या लेखाचे प्रयोजन आहे. आपल्या संक्षेप कौशल्यावर, आकलनावर आणि लेखन- शैलीवर सारलेखनाचे यश अवलंबून आहे असे लक्षात आल्यावाचून राहात नाही. i -- भाषेचा व्यवहार, मराठी घटना आणि परंपरा समजावून घेत असताना लेखन, वाचन, भाषण, श्रवण अशा चार अंगांनी भाषेचे ज्ञान होते. सारलेखनात यापैकी वाचन, श्रवण याला अधिक महत्त्व आहे. वाचन श्रवणातूनच आपल्याला विविध विषयाचे ज्ञान प्राप्त होते. त्यात आपल्या विचारांना चालना मिळते व आपणही स्वतःचे विचार त्यात समाविष्ट करीत असतो. आपल्या भावना आणि संवेदनक्षमतेतून हे सारे घडते. अशा संकलित ज्ञानापासूनच आपण उताऱ्याचे यथार्थ आकलन करू शकतो. आपली स्वतःची भाषाही या अभ्यासातून संस्कारित झालेली असते. इतरांच्या प्रतिपादनातील आशय समजावून घेणे *. ही मूलभूत गोष्ट सारलेखनासाठी आवश्यक आहे. कारण आकलन (Comprehension ) झाले नाही तर त्याचे सारग्रहण (Precis) शक्य होणार नाही, सुयोग्य आकलनाशिवाय सार- लेखन सूत्रबद्धपणे करता येणार नाही. आपल्याला दिलेल्या [ ४५