पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३) वाचकांना वृत्तांत सरळ कळेल असा देतांना त्याचा गाभा वृत्तांताच्या सुरुवातीलाच द्यावा. या कृतीला प्रस्ताव हा पारि- भाषिक शब्द आहे. १४ ) वृत्तांतात लिहिताना पाल्हाळ टाळावा. भाषणाचा वृत्तांत लिहिणान्याला सबंध भाषण जसेच्या तसे अचूक देणे कठीण जाते. 3 मग वेचक विचार, शैलीदार वाक्ये आणि लक्षात राहिलेला व शब्दांत साकार झालाच पाहिजे असा आशय देण्याचा प्रयत्न करावा लागतो. १५) या सर्व गोष्टींसाठी एकाग्र मनोवृत्ती हा वृत्तांत लेखकाचा अत्यावश्यक गुण आहे.