पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क) वक्त्याच्या बोलण्यात एखादा विवाद्य मुद्दा आल्यास त्या संदर्भातील श्रोत्यांच्या प्रतिक्रिया वृत्तांताच्या अखेरीस न विसरता द्याव्यात. मात्र एखादा मुद्दा आपल्याला नीट स्पष्ट न झाल्यास व्याख्यानानंतर वक्त्यास भेटून स्पष्ट करून घ्यायला हरकत नाही. एखादा मुद्दा जरी आपल्याला पटला नाही तरी तो वक्त्याचे मत म्हणून नमूद करणे वृत्तांत लेखकाचे कर्तव्य आहे. ड) वृत्तांत - लेखकाने लेखनमर्यादा आणि लेखनसीमा यांचे भान ठेवावे. यावरून सभा - परिषदांचे वृत्तांत लिहिणे ही एक मोठी कठीण गोष्ट असून ती जबाबदारी वृत्तांत - लेखकाला पार पाडावीच लागते. वृत्तांत लेखन : अपेक्षा - वृत्तांत - लेखनात साधारणपणे पुढील गोष्टी अपेक्षित आहेत. त्यातूनच वृत्तांत - लेखकाला मार्गदर्शन होईल. १) एखाद्या कार्यक्रमाचा वृत्तांत सांगतांना त्यात कार्यक्रम सुरू झाल्याची वेळ, स्थळ, गाव, तालुका, जिल्हा, राज्य यांची आवश्यकतेनुसार नोंद घ्यावी. प्रमुख पाहुणे वा समारंभाचे अध्यक्ष • यांच्या भाषणाचा सविस्तर वृत्तांत आला पाहिजे. त्यात शक्यतो मुळातले उद्गार अवतरण चिन्हात यावेत. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची ठळक नावे यावीस. कार्यक्रमाच्या आरंभी स्वागत, प्रास्तविक कोणी केले, हे त्यातील तपशीलासह द्यावे आणि शेवटी आभार कोणी मानले, कार्यक्रम केव्हा संपला, याबाबत फार तर समारोपादाखल एखादे वाक्य यावे. ४१