Jump to content

पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निवड झाल्यावर तिने एखादा महत्त्वाचा यशाचा टप्पा गाठल्यावर त्या व्यक्तीला जाहीरपणे मानपत्र देण्याची प्रथा आहे. पुष्कळदा वयाची साठी, पंच्याहत्तरी, क्वचित शंभरी ओलांडल्याच्या आनंदाप्रित्यर्थ हे षष्ठन्दि - अमृत - शतक महोत्सव साजरे होतात. अशा वेळी दिले जाणारे मानपत्र म्हणजे, त्या सन्मानित होणाऱ्या व्यक्तीचे विविध क्षेत्रातील लक्षणीय कार्य, त्याचा चरित्रात्मक वृत्तांत - लेखनच होय. या मानपत्रात त्या व्यक्तीचा वारसा, त्याच्या घराण्यांचा पूर्वेतिहास, जन्म, बालपण, शिक्षण, परिस्थिती, संस्कार, सार्वजनिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील कार्य, भूषविलेली विविध पदे, गाजविलेली मर्दुमकी, जीवनातील संदेश, व्यक्तीचे महत्त्वाचे विचारधन इत्यादींचा समावेश होतो. ९) सभा - परिषदांचा वृत्तांत सभेचा किंवा परिषदेचा वृत्तांत देतांना काही गोष्टी विशेष महत्त्वाच्या म्हणून श्री. ज. पां. देशमुखांनी आपल्या 'पत्रकार' या पुस्तकात यथार्थपणे सांगितल्या आहेत. अ) सभा अगर परिषद कोठे चालू होती - त्या स्थळाचे वर्णन, ठिकाण, नेमके कोणत्या ठिकाणी आहे त्याचे वर्णन, सुशोभित मंडपातील अगर सभागृहातील वातावरण कसे होते, व्यासपीठावर कोण बसले होते, सभेची वेळ कोणती होती, प्रत्यक्षात सभा केव्हा सुरू झाली, उशीर झाल्यास का आणि कोणामुळे झाला, वक्त्याने विलंब लावल्यास प्रारंभी क्षमा मागितली काय, एवढ्या गोष्टी घ्याव्यात. ब) एखाद्या सभेला अमर्याद गर्दी असल्यास तेथे आयत्या वेळी झालेल्या गोंधळाबाबतचा तपशील उपस्थित लोकांच्या उद्गारात वा शब्दांत द्यावा. ४०