पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२) वृत्तांत वाच्यार्थयुक्त शब्दांत असावा. तसेच त्यात कथनात्मकता किंवा निवेदनशैली असावी. शब्दांना सरळ अभिधा- अर्थ असल्याने अर्थाचे अनेक अर्थ न होता सरळ वाचताक्षणी वार्ता उलगडते म्हणूनच अशी साधी, सोपी, आशयाचा वेध घेणारी, हृदयाला भिडणारी सरळ भाषाच वृत्तांत लेखनात उपयुक्त ठरते. ३) सभा परिषदांचे वृत्तांत लिहितांना सर्वकष स्वरूपाचे ज्ञान वृत्तांत - लेखकाला असले पाहिजे. सभांना उपस्थित राहून तेथे चालू असलेल्या कामकाजाकडे कोणत्या दृष्टीने पाहावे, याचे सम्यक ज्ञान वृत्तांत लिहिणा-याला असले पाहिजे. त्याला सभा- शास्त्र माहित हवे. ४) विविध वृत्तपत्रांचे - त्यातील अग्रलेख, स्तंभलेख, पुस्तक - परीक्षणे यांचे वाचन सातत्याने वृत्तांत लेखकाने करणे आवश्यक आहे. पाहुण्यांच्या भेटी-गाठी, मुलाखती, आकाशवाणी, दूरदर्शन इ. माध्यमांतून सादर होणाऱ्या कार्यक्रमांतून वृत्तांत - लेखनास साहाय्यभूत होणाऱ्या गुणांचा परिपोष आपणास करून घेता येईल. ५) वृत्तांत -- लेखकाने एक प्रयोग करून पाहायला हरकत नाही, तो म्हणजे आपण स्वतः उपस्थित राहून समक्ष अनुभवलेल्या कार्यक्रमांचे वृत्तांत मुद्दाम सावधानतेने वाचत जावे. त्यातून विविध वृत्तपत्रांतून येणारे एकाच कार्यक्रमाचे वृत्तांत वाचले तर आपणास त्यातील विविध लेखन, कथनशैलीची प्रचीती येऊ शकेल. ६) वृत्तांत लिहितांना आपणास उपलब्ध असलेल्या जागेचे, पृष्ठांचे वा शब्दमर्यादेचे भान ठेवणे आवश्यक आहे.. ७) वृत्तपत्रांतून नेहमीच सत्कार, चमत्कार, बलात्कार, होकार, नकार यांच्या बातम्या येतात. त्याचप्रमाणे आग, लाठीमार, ४२