पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मतांतरही असू शकते. पोलिसी खात्यातील वृत्तांत, मुलाखती निर्जीव, रुक्ष व तांत्रिक खटपटींनी भरलेले असतात. कुशाग्र वृत्तांत लेखक हे सगळे टाळून वस्तुस्थिती, स्थळ काळाचे भान राखून वाचकांची उत्कंठा व समाधान जागृत करून वृत्तांत लिहितो. यासाठी नेटकेपणाने तपशील टिपण्याचे कौशल्य लाभते. पुनरुक्ती टाळून महत्त्वाच्या बाजूचा विधानाचा या प्रकारच्या वृत्तांत- लेखनात विचार करावा लागतो. ७) विविध मंडळांचे वार्षिक इतिवृत्त आपल्याकडे सार्वजनिक वाचनालये, नाट्य-संस्था, सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळे यांचे वर्धापन दिन वा महत्त्वाचे कार्यक्रम साजरे होतात. तसेच व्यापारी- सहकारी बँका, महा- विद्यालयातील ग्रंथालये, अन्य विविध विभाग यांच्या वर्षभरातील कार्याचे इतिवृत्त, वार्षिक अहवाल सादर करावे लागतात. साधारणपणे प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेत हे वृत्तांत छापील स्वरूपात सादर करतात. हे वार्षिक वृत्तांत - लेखनच असते. त्यासाठी संपूर्ण वर्षभराची दैनंदिनी डोळ्यांसमोर ठेवून त्यातील ठळक गोष्टींची नोंद, निवडक घटना प्रसंगविशेषासह सांगाव्या · लागतात. वेळोवेळी होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळा, दिनांक, वक्त्याचे उद्गार, प्रमुख व अन्य उपस्थित यांची कच्ची नोंद यासाठी ठेवावी लागते. त्यातूनच वर्षाच्या अखेरीस सादर करावयाचा वृत्तांत तयार होतो. तो रटाळ, कंटाळवाणा होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. ८) मानपत्रांचे लेखन " ' मानपत्र' म्हणजे कर्तबगार व्यक्तीच्या जीवनाचा आलेख, समग्र वृत्तांतच असतो. एखाद्या महनीय व्यक्तीची विशिष्टपदी ३९