Jump to content

पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पण तुम्ही असेच बोललात' हे आत्मविश्वासपूर्वक ठणकावून सांगता आले पाहिजे. अशा वेळी निःपक्षपाती व सत्यप्रिय श्रोते जरूर वृत्तांत लेखकाच्याच बाजूने कौल देतील. वृत्तांत - लेखकाने सत्य परिस्थितीचे निवेदन केले पाहिजे. बोलणाऱ्याच्या बोलण्याला किंवा कोणत्याही मूळातील आशयाला विकृत वळण लागणार नाही, याची त्याने खबरदारी घ्यावी. कोणताही महत्त्वाचा मुद्दा वगळला जाता कामा नये. शिवाय लेखकाने आपले वैयक्तिक विचार वा मत त्यात मिसळण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा वृत्तांत लेखकाने आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीचा तो निश्चितच दुरुपयोग होईल. वृत्तांत लेखकाने नेहमी वस्तुस्थिती कथन केली पाहिजे. वाचकांची या लेखनाने दिशाभूल होता कामा नये. समजा एखाद्या सभेला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची संख्या सांगावयाची असेल तर तेथे वस्तुस्थिती सांगणे विश्वासार्ह होईल. अकारण संख्येचे आकडे कमी जास्त सांगून वाचकांचा विश्वास गमावल्यासारखे होऊ शकेल. काही वेळा उपस्थित मान्यवरांची नावे देतांना आपल्या मित्रांची नावे देऊ नयेत. आपल्या स्नेहसंबंधातील वा परिचितांतील प्रतिष्ठितांची नावे देणे अनुचित ठरेल. उलट आपले विरोधक असूनही ते प्रतिष्ठित असल्यास त्यांचीही नावे मान्यवर उपस्थितांत आवर्जून आलीच पाहिजेत. वृत्तांतात सत्याचा अपलाप करण्याचे प्रयोजन नसते. सभेच्या वृत्तांतात वक्त्यांच्या बोलण्यातील मुख्य आशय येईल, अशा सभेत गोंधळ - गडबड झाल्यास तिचाही वास्तवस्पर्शी परामर्श निःपक्षपातीपणाने रेखाटला पाहिजे. ० ३४