पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साधारणपणे वृत्तांत - लेखकांकडून यशस्वी वृत्तांत - लेखन होण्यासाठी उपरोक्त गुणांची आपण अपेक्षा ठेवायला हरकत नाही. यावरून वृत्तांत - लेखक हा अभ्यासू वृत्तीचा हवा. त्याने विशिष्ट प्रकारे प्रशिक्षण घेऊन वा लेखनाचा सराव करुन वृत्तांत- लेखन कला संपादन केली पाहिजे. सूक्ष्म वास्तवदर्शी दृष्टिकोन आणि मनोवृत्ती त्याने जोपासली पाहिजे. वृत्तांताशी संलग्न अशा समान स्मृतींची नोंद, योग्य ठिकाणी, त्याला वृत्तांतात घेता आली पाहिजे. आपल्या बुद्धिचातुर्याचा विनियोग वृत्तांत-लेखकाने वृत्तांत - लेखनात केला पाहिजे. सभा, संमेलने, परिषदा, कायदे- मंडळांची अधिवेशने, क्रीडा, रंगभूमी, सिनेमा, कला इ. अनेकविध क्षेत्रांतील वृत्तांत वेळोवेळी टिपावे लागतात. यासाठी या अनेक क्षेत्रांतील मर्मज्ञ असा वृत्तांत लेखक हवा, वृत्तांत कोणत्या शैक्षणिक पातळीच्या व दर्जाच्या वाचकांसाठी आहे, याचे भान लिहिताना त्याने ठेवणे आवश्यक आहे. शिवाय हे सारे लेखन त्याने समतोल बुद्धीने केले पाहिजे. वृत्तांत सुव्यवस्थितपणे लिहिता येणे हे सुद्धा एक शास्त्र आहे असेही म्हणता येईल. वृत्तांत - लेखकाने अत्यंत काळजीपूर्वक बोलणा-यांच्या वक्तव्याकडे लक्ष पुरविले पाहिजे. त्यांसाठी त्याला लेखनाचा सराव असला पाहिजे. शिवाय 'स्टेनो ' प्रमाणे स्वतःला उलगडणारी अशी एक सांकेतिक लघुलिपी जलद गतीने लिहिण्या- साठी त्याला अवगत असली पाहिजे. समजून-उमजून जलद गतीने वृत्तांताची कच्ची नोंद घेता आली पाहिजे. मग स्वस्थपणे वृत्तांताचे अंतीम लेखन करता येईल. वृत्तांत - लेखकाने यासाठी जागरूकं राहून व्यवस्थित वृत्तांत घेतला पाहिजे. समजा, बोलणारा एखाद्या वेळी नाकबूल करणारा असला तरी 'तुम्हाला बोलतांना भान नव्हते, ३