पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

33 , वृत्तांत - लेखनाच्या सरावासाठी वर्तमानपत्रातून नियमित प्रसिद्ध होणारे वृत्तांत बारकाईने वाचण्याची सवय ठेवली पाहिजे. वृत्तांतात नाविन्य ओतता आले पाहिजे. इंग्रजीतील 'न्यूज' शब्दाचा अर्थ " नवीन असाच आहे, नवीन मूर्त स्वरुपात यावयाच्या संशोधनाविषयीचा वृत्तांत हा काल्पनिक वृत्तात मोडतो, तर वाचकांना स्वारस्य नसलेली अशी एखादी महत्त्वाची घटना ( उदा. : नव्या अभ्यासक्रमाचा वृत्तांत) ही सुद्धा वृत्तांतातच मोडते. सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक इ. क्षेत्रांतील नव्या जुन्या प्रवृत्ती यांचा समावेश वृत्तांत - लेखनात करता येती. . उदाहरणादाखल पाहणीचे वृत्तांत यात समाविष्ट करता येतील. वृत्तांत रोचक आणि आकर्षक होण्यासाठी त्यात धक्का- दायक व अनपेक्षित असे काहीतरी असावे लागते. उदा. : 'पंचवटी एक्सप्रेस सुखरूप पोहोचली', "भक्ताने देवाला नमस्कार केला”. हे वृत्तांत सपक, आळणी वाटतील. पण 'पंचवटी एक्सप्रेसला पोहोचण्यास विलंब झाला किंवा भक्ताने देवाचे दर्शन नाकारले', हे वृत्त अनपेक्षित धक्कादायक म्हणूनच लक्ष्यवेधी ठरते. तसे पाहिले तर कोणत्याही वाचकाला सर्वात मोठी वाटणारी बातमी म्हणजे स्वतःबद्दलची असते. ' सिडल' या अमेरिकन संपादकाने आपल्या कचेरीत सर्व प्रमुख जागी एका वाक्याचा फलक लावला होता • There is one subject and one subject only that interests everyone everywhere all the time, that subject is ME. ' प्रत्येक वाचकाला सिडलच्या म्हणण्यानुसार सर्वत्र सर्वकाळ अत्यंत आवडीचा विषय म्हणजे मी स्वतः' हा होय. उदा. : मान्यवर व्यक्तींच्या भाषणाच्या वृत्तांतात मान्यवरांच्या उपस्थितीत कोणाकोणांची नावे ३५