पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्या प्रश्नांची आद्य अक्षरे म्हणजे 'फाइव्ह डब्ल्यूज' व एक 'एच्. अशी आहेत. त्यात वृत्तांत लेखनाचे सारे मर्म येते. हे प्रश्न म्हणजे who, what, when, where, why & how हे होत. & मराठीत या प्रश्नांचे भाषांतर सहा "" क मध्ये करता येईल. कोणी, काय, केव्हा, कोठे, का आणि कसे या सहा 'क' कारांना उत्तरे दिल्यानंतर वृत्तांत म्हणजे काय हे पूर्णपणे स्पष्ट झाल्याशिवाय राहत नाही. या उत्तरात वृत्तांत तयार होतो... या गोष्टी वृत्तांत-लेखनात अपरिहार्यपणे याव्यात. वृत्तांत लेखनाची पूर्वतयारी - वृत्तांत - लेखनासाठी वृत्तांत - लेखकाजवळ पुढील गोष्टींची आवश्यकता आहे. १) लेखन - चिंतनातील गती २) भाषाप्रभुत्व, लेखनशैली (३) कल्पकता आणि स्मरणशक्ती ४) विचारातील सुस्पष्टता ५) अल्पाक्षर - रमणीयत्व ६) व्यासंग, अद्यावत वाचन, ७) प्रसंगावधान, समयोचितता, बहुश्रुतता. .. ८) साद-पडसाद, क्रिया-प्रतिक्रियांची जाणीव. .९) वाचकांना चटका लावण्याचे सामर्थ्य १०) चिकित्सक व जिज्ञासू वृत्ती ११) वाचकांशी विश्वासार्ह मैत्री १२) सुंदर हस्ताक्षर घ ३२